तरुण भारत

जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

लंडन / वृत्तसंस्था :

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर उजव्या ढोपराला झालेल्या दुखापतीमुळे आगामी आयपीएल स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने आर्चर इंग्लंडच्या आगामी लंकन कसोटी दौऱयातही खेळू शकणार नसल्याचे यावेळी जाहीर केले. आर्चरला या दुखापतीतून सावरण्यासाठी साधारणपणे तीन महिन्यांची विश्रांती घ्यावी लागेल, असे संकेत आहेत. आर्चर आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघात समाविष्ट आहे. 24 वर्षीय बार्बाडोसने इंग्लंडतर्फे 7 कसोटी व 14 वनडे सामने खेळले असून त्यात अनुक्रमे 30 व 23 बळी घेतले आहेत. याशिवाय, त्याने एक टी-20 सामना खेळला आहे.

Advertisements

राजस्थान रॉयल्सला आगामी आयपीएल स्पर्धेत त्याची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवू शकते. आयपीएल स्पर्धेत आर्चरने 23.69 च्या सरासरीसह 26 बळी घेतले आहेत. 2018 मधील आयपीएल हंगामात या उंचापुऱया जलद गोलंदाजाने 10 सामन्यात 21.66 च्या सरासरीने 15 बळी तर 2019 मध्ये 11 सामन्यात 26.45 च्या सरासरीने 11 बळी घेतले आहेत.

Related Stories

महिला निवड समिती अध्यक्षपदी नीतू डेव्हिड यांची नियुक्ती

Patil_p

टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज

Patil_p

रूमानियाचे तीन वेटलिफ्टर्स अपात्र

Patil_p

व्हेलॉसिटीची सुपरनोव्हाजविरुद्ध विजयी सलामी

Omkar B

बांगलादेशचा पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर

Amit Kulkarni

द.आफ्रिकेच्या वनडे कर्णधारपदी क्विटॉन डी कॉक

Patil_p
error: Content is protected !!