तरुण भारत

हुन्नूर येथे मृतदेह ठेवून निदर्शन

वार्ताहर / जमखंडी :

गेल्या काही दशकापासून अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या स्मशानभूमीत अतिक्रमण झाल्याच्या निषेधार्थ मृतदेह ठेवून निदर्शने केल्याची घटना जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथे घडली. एका राजकीय नेत्याने ही जागा खरेदी केल्याचे सांगून काही समाधीही येथील हटविल्या असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांना हा अन्याय दूर करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे.

Advertisements

हुन्नुरातील मागासवर्गीय, दलित येथील एका जागेत गेल्या 70 वर्षांपासून अंत्यसंस्कार करीत आहेत. वर्षानुवर्षे अंत्यसंस्कार करण्यात येत असलेली जागा खरेदी करणे शक्मय आहे का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच सदर जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देवेंद्र मदरखंडी, शांतवीर पुजारी, मारुती शिंदे, सदाशिव कंडपगोळ, सदाशिव कांबळे, हणमंत होळेप्पगोळ,  सुरेश मदरखंडी, कल्लाप्पा बळुती, गोपाल पुजारी, अण्णाप्पा मदरखंडी आदींनी निदर्शनात भाग घेतला.

अन्याय दूर करावा, अन्यथा आंदोलन छेडणार

परिशिष्ट जाती-जमातीच्या जनतेला स्मशानभूमी सरकारने उपलब्ध करून द्यावी. 70-80 वर्षांपासून स्मशानाकरिता वापरण्यात येत असलेली जागा मागासवर्गीयांना स्मशानाकरिता देऊन अन्याय दूर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य दलित संघर्ष समितीचे संचालक राजू मेलिनकेरी यांनी दिला आहे. s

 

Related Stories

बालविवाह रोखण्यासाठी ‘सुरक्षिणी’ वेबपोर्टल

Amit Kulkarni

पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

Patil_p

युवा कीर्तनकाराचा आवाज पोहोचला मुंबई दरबारी

Amit Kulkarni

विजयनगर येथे आयोजित शेतकरी सभा उत्साहात

Patil_p

वॉटर प्युरिफायर, शिलाई मशीनची ‘जितो’तर्फे भेट

Amit Kulkarni

बचतीतून महिलांनी ‘अन्नपूर्णा’ उभी केली

Patil_p
error: Content is protected !!