तरुण भारत

लाच घेणाऱ्या अधिकाऱयाला तत्काळ शिक्षा द्या : मनिष सिसोदिया

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सीबीआयने दिल्ली सचिवालयाचे अधिकारी गोपाल कृष्ण माधव यांना जीएसटी संबंधीत दोन लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केली आहे.

गोपाल कृष्ण माधव हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) असल्याचे समजते. गोपाल कृष्ण माधव हे  2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात काम करत आहेत.

दरम्यान,  या प्रकरणी मनीष सिसोदिया यांनी गोपाल कृष्ण माधव यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यांसदर्भात मनिष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. सिसोदिया म्हणाले, सीबीआईने एका अधिकाऱया लाच घेताना पकडले आहे. हा अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत होता. सीबीआयने त्याला तत्काळ शिक्षा द्यायला हवी.’ 

गोपाल कृष्ण माधव यांना तत्काळ शिक्षा व्हावी. गेल्या 5 वर्षांत अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी स्वत: पकडले आहे.

 

Related Stories

निर्भया : पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

prashant_c

बिगरमुस्लीम शरणार्थींची यादी तयार

Patil_p

देशात रुग्णसंख्या 23 लाखांच्या पुढे

Patil_p

‘या’ राज्यातील तब्बल 192 विद्यार्थी आणि 72 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

pradnya p

भुतरामहट्टी अपघातातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

sachin_m

नागरिकत्व कायद्याबाबत शिवसेनेची भूमिका कलुषित : आठवले

prashant_c
error: Content is protected !!