तरुण भारत

महाभियोगाचा बार निघाला फुसका..!

अखेर ट्रम्प जिंकले, त्यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या महाभियोगाचा निकाल देताना सिनेटने त्यांना निर्दोष सोडले. त्यांच्यावरचे दोन्ही आरोप बहुमताने फेटाळण्यात आले. त्यांना निर्देष ठरवण्यात आल्याने त्यांची राष्ट्राध्यक्षीय कार्यालयातून हकालपट्टी करण्याचे मनसुबेच निरर्थक ठरले. महाभियोगाचा बार फुसका निघाला.आपले राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील प्रतिस्पधी जो बिडेन आणि त्यांचा पुत्र या दोघांचे तुमच्या देशातील आर्थिक गैरव्यवहार खणून काढा, असा ‘आदेश’ अमेरिकेच्या लष्करी शक्तीच्या बळावर युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांवर आणण्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होता. सत्तेचा गैरवापर (ऍब्युज ऑफ पॉवर) असे त्याला म्हणतात. दुसरा आरोप होता काँग्रेसच्या कामात अडथळे आणल्याचा. या दोन्ही आरोपांवरुन ट्रम्प यांच्याविरुद्ध सुरु झालेल्या महाभियोगाचे कामकाज जेमतेम तीन आठवडेही चालले नाही.

अभियोगाची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 जानेवारीला सुरु झाली. एका बाजूला डेमोप्रॅट्स आणि दुसऱया बाजूला रिपब्लिकन अशी विभागणी होती. सिनेटमध्ये बहुमतात असलेल्या डेमोप्रॅटिकांच्या नेतृत्वाने मिच मॅककॉनेल यांनी दोन्ही पक्षांनी फक्त दोनच दिवसात आपापल्या बाजू मांडाव्यात असा प्रस्ताव मांडला. त्याला त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी विरोध केल्यावर आणखी एका दिवसाने ही मुदत वाढवण्यात आली. त्या दिवसानंतर पुन्हा, काही नवे साक्षीदार उपस्थित करण्याची अनुमती मागून आणि आणखी ताजे पुरावे सादर करावयाचे आहेत त्यासाठी ही परवानगी मागून मिच मॅककोनेल यांनीच ही तपासणीची प्रक्रिया (चर्चा) आणखी काही दिवस लांबवली. या महाभियोग प्रकरणी डेमोपॅट्सच्या सात वकिलांची फौज ट्रम्पविरोधी भूमिका मांडत होती. ऍडॅम श्चिफ हे काँग्रेस सभासद त्यांचे नेतृत्व करत होते. 22 जानेवारी रोजी त्यांनी आपला तोंडी युक्तिवाद सुरु केला. सिनेटच्या सभासदांनी गच्च भरलेल्या सभागृहात तो होत होता. उत्सुकता तर मोठी होती.

Advertisements

‘अमेरिकेची राज्यघटना तयार करणाऱया आदरणीय कायदेपंडितांनी ‘सत्तेचा गैरवापर होऊ शकतो’ हे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना कोणती ते नमूद केले होते. अमेरिकेतील शासनव्यवस्थेतील अत्युच्च पदस्थ व्यक्तींकडूनही असा गैरवापर होऊ शकतो म्हणून ही महाभियोगाची तरतूद त्यांनी केली’’ असे म्हणून श्री श्चिफ   यांनी ‘त्या घटनाकारांच्या मनातील भीती खरी ठरावी, असेच वर्तन राष्ट्राध्यक्षांनी केले आहे,’ असा घणाघाती शाब्दिक प्रहार केला. या घातक प्रवृत्तीला आणि कृत्याला आळा घालण्यासाठी तितकीच कठोर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली. या तोंडी युक्तिवादासोबत आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी या वकिलांनी काही ध्वनीमुद्रणे आणि चित्रफिती (ऑडिओ आणि व्हिडीओ) सादर केल्या. या वकील सभासदांना ‘इंपीचमेंट मॅनेजर’ म्हटले जाते. या ध्वनीमुद्रणांत खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आवाज ऐकू येत होता याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. स्वतः ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अलीकडेच केलेल्या कथित दूरध्वनी संभाषाचाही त्यात समावेश होता. बिडेन पितापुत्रांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची धडपड राष्ट्राध्यक्षांनी युपेनच्या मदतीने जाणून बुजून चालवल्याचा आरोप स्पष्टपणे करण्यात आला. काँग्रेसच्या कामकाजात अडथळा हा दुसरा आरोप. लोकनियुक्त प्रतिनिधीगृहाच्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासनातील काही व्यक्तींना ट्रम्प यांनी मनाई केली, असे केल्याने या प्रकरणातील सत्य लपवण्याचे कृत्य त्यांनी केले आहे, असा जोरदार युक्तीवाद या सात ‘मॅनेजरां’च्या तुकडीने केला.

डेमोक्रस्टच्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी आपली बाजू ट्रम्प यांच्या समर्थकांनी अवघ्या दोन तासांत मांडली. राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही चुकीचे कृत्य केले नव्हते असे त्यांनी ठासून सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी दूरध्वनीवरुन जे बोलणे केले ते राष्ट्रहितासाठीच होते, असे या रिपब्लीकन चमुतील सभासदांनी सांगितले. यासाठी मजेदार शाब्दिक कसरत त्यांनी केली ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या संभाषणादरम्यान ‘डू अस ए फेव्हर’ असे विधान ट्रम्प यांनी उच्चारले होते, हे सांगत, ‘व्हाइट हाऊस’चे उपअभिवक्ते माइक पुर्मुरा यांनी या विधानात ते ‘अस्’ म्हणजे आमच्यावर उपकार करा असे म्हणाले, ‘मी’ म्हणजे ‘माझ्या’करिता एवढे करा असे म्हणाले नाहीत असा. एक वरवर साधा पण प्रत्यक्षात कमालीचा निर्णायक ठरलेला मुद्दा मांडला. डेमोप्रॅट्स सदस्यांनी चालविलेला महाभियोगाचा हा खटाटोप म्हणजे राष्ट्राध्यक्षांना येत्या वर्षाअखेर येणाऱया निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी जोरदारपणे केला. 27 जानेवारी रोजी ऍटर्नी केनेथ स्टार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. बारीकसारीक निमित्त घेऊन महाभियोग दाखल करणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे. अशाने ऊठसूठ ‘महाभियोग’ आणण्याचा पायंडा पडेल, आणि भविष्यात आपल्याला नको असलेल्या उच्चपदस्थ शासकांविरोधात ते हे एक ‘शस्त्र’ म्हणून वापरले जाऊ लागेल असा इशारा स्टार यांनी दिला. ‘महाभियोग’ हा प्रकार युद्धाइतकाच निंदनीय आहे. तो विद्वेषाने भरलेला असतो आणि संपूर्ण राष्ट्रातील जनमनाच्या विभागणीचे कारण ठरतो, असे म्हणून त्यांनी युक्तीवाद पूर्ण केला. बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी या उत्सुकतापूर्ण खटल्यांचा निकाल लागला. संपूर्ण सभागृह अशाप्रकरणी ‘ज्युरी’ची भूमिका निभावते. ट्रम्प यांच्यावरील दोन्ही आरोपांवर स्त्रतंत्रपणे मतदान घेण्यात आले. पहिल्या आरोपाबाबत सत्तेचा गैरवापर ट्रम्प यांच्या विरोधात 48 तर बाजूने 52 मते पडली. दुसऱया काँग्रेसच्या कामात अडथळा, या आरोपाबाबत त्यांच्या विरोधात आणखी एकमत कमी झाले, म्हणजे 47 पडली आणि बाजूने 53 मते पडली.  महाभियोगातून ट्रम्प निर्दोष सुटणार हे भाकित सोमवार मंगळवारीच अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी वर्तविले होते, बुधवारी त्यावर रितसर शिक्कामोर्तब झाले आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महाभियोगाचा बार अग्निपरीक्षेतून सुलाखून बाहेर पडले. एकूण महाभियोगाचा बार फुसकाच निघाला.

‘ट्रम्प यांचा खरा निवाडा येत्या निवडणुकीत मतदारच करतील.’ अशी कुजबूज मात्र डेमोप्रॅट्स आणि रिपब्लीकन या दोन्ही पक्षांच्या सभासदांमधून ऐकू आली!

राजेंद्रप्रसाद मसुरकर,  9960245601

Related Stories

वीज बिल सवलतीने वर्षपूर्ती व्हावी!

Patil_p

विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये काय होणार ?

Amit Kulkarni

कोरोनाची लस आता अगदी नजीकच्या टप्प्यात

Patil_p

मंत्रिकपातीचे सूतोवाच

Patil_p

मोसमी पावसाचा बिगूल

Patil_p
error: Content is protected !!