तरुण भारत

328 दिवसांनी ख्रिस्तिना परतली पृथ्वीवर

अंतराळात सर्वाधिक वास्तव्य : 11 महिन्यात सहावेळा स्पेसवॉक

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रम अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच हिने आपल्या नावावर केला आहे. तब्बल 328 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करून ती सुखरूपपणे पृथ्वीवर परतली आहे.

कझाकिस्तानच्या डझहेजझगन येथे गुरुवारी ख्रिस्तिना उतरली आहे. ख्रिस्तिनाने अंतराळात 328 दिवस व्यतीत करण्यासह पृथ्वीला 5,248 वेळेस प्रदक्षिणा घातल्या आहेत. यासाठी तिने 3.9 कोटी किलोमीटरचे अंतर पार केले. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यात 291 फेऱया मारण्याइतके आहे. गेल्या 11 महिन्यांत तिने 6 वेळा ‘स्पेस वॉक’ केले.

 ख्रिस्तिना यांच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आगामी चंद्र आणि मंगळ मोहिमांबरोबरच गुरुत्वाकर्षण आणि अंतराळातील किरणोत्सर्गाचा महिलांच्या शरीरावर पडणारा प्रभावाचा अभ्यास करणे हा होता. चंद्रावर अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे ‘नासा’चे ध्येय असून, त्यासाठी हे अध्ययन उपयुक्त ठरणार आहे.

Related Stories

किचनचा पाईप दुरुस्त करण्यासाठी 4 लाखांची मागणी

Patil_p

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Abhijeet Shinde

पॅरिस : जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला

datta jadhav

40 टक्के कोरोनाबाधितांमध्ये नसते एकही लक्षण

Patil_p

इस्लामिक संघटनेत भारताचा व्हेटो

Patil_p

ट्रम्पनी केला पराभव मान्य

Patil_p
error: Content is protected !!