तरुण भारत

शिवसेनेच्यावतीने झालेला सत्कार पोलीस दलासाठी प्रेरणादायी – अप्पर पोलीस अधीक्षक काकडे

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुर- कर्तव्याप्रती निष्ठा, लोकाभिमुखता, धाडस आणि टीम मार्गदर्शन या पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांच्या गुणांमुळे कोल्हापूर पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. म्हणूनच समाजातील विविध स्तरातून पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. नेहमी पोलिसांच्या चुका दाखविणाया शिवसेनेने जिवावर उदार होवून लढलेल्या अधिकारी व कर्मचायांचा केलेला गौरव निश्चितच जिल्हा पोलीस दलासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी केले. जिल्हा शिवसेनेच्या वतीने बिष्णोई गँगला पकडणाया पोलीस अधिकारी व कर्मचायाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

Advertisements

                  किनी टोलनाक्यावर जीवावर उदार होऊन कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचायांनी राजस्थान राज्यातील अत्यंत खतरनाक  अशा बिष्णोई गॅंगला पकडले होते. या मोहिमेमध्ये त्यारात्री थरारक घटनेमध्ये हिरो ठरलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचायांच्या सत्काराचे नियोजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते. शुक्रवार 8 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधीक्षक कार्यालयात जाऊन 

सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले, हवालदार नामदेव यादव, पांडुरंग पाटील,रणजित कांबळे, पोलीस नाईक वैभव पाटील, रवी कांबळे, सूनील इंगवले, सुरेश पाटील, चंद्रकांत ननावरे यांचा भगवे फेटे बंधूंचा सत्कार केला.

          तर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा रंगीबेरंगी फेटे बांधून व भगवी शाल अर्पण करून सत्कार केला. त्या रात्री जीवाची बाजी लावून अतुलनीय शौर्य दाखवणाया कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकायांच्या बद्दल शिवसेनेला गर्व वाटत असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे टोल नाक्या सारख्या ठिकाणी प्रचंड गर्दी असताना एकही नागरिक व पोलिस जखमी न होता खतरनाक टोळी पकडणाया या कर्मचायांना शौर्यपदक पुरस्कारांनी गौरवले जावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

            पोलीस निरीक्षक तानाजी सावंत म्हणाले, कोल्हापूर शहर, इथली माती व रांगडी माणसं यांच्या पूर्वीपासून प्रेमात पडलो आहे. इथल्या नागरिकांची प्रेरणा त्याच बरोबर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन आणि बिष्णोई गॅंगला पकडण्यासाठी त्यांचे नियोजन,विश्वास सार्थ ठरला असल्याचे सांगितले. टीम लीडर कसा असावा हे उत्तम उदाहरण पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या या सत्कारामुळे आपल्याला यापुढेही जाऊन कर्तव्य पूर्ती आणि जनसेवा करण्याचे बळ आल्याचे त्यांनी सांगितले.

        अपर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे म्हणाले, कुटूंबातील व्यक्तींनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप निश्चितच बळ देणारी असते. पोलीस कर्मचायानी जिद्द, चिकाटीने खिंड लढवली. त्यामुळेच कोल्हापूर पोलिस दलाचे नाव देशभर उंचावले आहे. एका राज्यांला वेठीस धरणाया खतरनाक गॅंगला जीवावर उदार होऊन पकडणाया कोल्हापूर पोलिसांना नक्कीच शौर्यपदक मिळायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, राजू यादव, शशी बिडकर, अवधूत साळोखे, प्रवीण पालव,पप्पू कोंडेकर, नरेंद्र तुळशीकर, रणजीत आयरेकर, दिलीप देसाई, अभिजीत बुकशेट यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

   

Related Stories

थेट पाईपलाईनने वर्षअखेरीस `गॅस’

Abhijeet Shinde

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Abhijeet Shinde

पूर्वपरवानगीत अडकली कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा

Abhijeet Shinde

फुलेवाडीचा जुना बुधवार पेठवर 3-0 गोलने एकतर्फी विजय

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यामध्ये दिवसभरात ४४ कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३७ बळी, नव्या रुग्णसंख्येत घट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!