तरुण भारत

सचिनला लाबुशानेत दिसते स्वतःचे प्रतिबिंब!

सिडनी / वृत्तसंस्था

उत्तम पदलालित्य हे ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशानेचे खास वैशिष्टय़. या नजाकतीच्या, शैलीदार फलंदाजीच्या बळावरच लाबुशाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास प्रत्येक पावलागणिक आत्मविश्वासाने, महत्त्वाकांक्षी झेप घेत आहे. या पार्श्वभूमीवर, सचिनने देखील त्याच्या वाटचालीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आणि लाबुशानेत आपल्याला स्वतःचीच पोचपावती दिसून असल्याचा दाखलाही दिला.

Advertisements

ऑस्ट्रेलियन जंगलात भीषण वणवे भडकल्यानंतर कोटय़वधीची हानी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, रविवारी निधी मिळवून देण्यासाठी प्रदर्शनीय सामना होत आहे. त्यातील रिकी पाँटिंग इलेव्हन संघाला प्रशिक्षण देण्यासाठी सचिन येथे आला. त्याप्रसंगी तो माध्यमांशी बोलत होता.

‘लॉर्डसवरील इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मी पाहत होतो. माझे काका माझ्यासमवेत होते. स्टीव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाल्यानंतर लाबुशाने आला. जोफ्रा आर्चरच्या दुसऱयाच चेंडूवर त्याला आघात झाला. पण, नंतरची 15 मिनिटे त्याची फलंदाजी पाहण्यासारखी झाली. त्याचे फूटवर्क अतिशय उत्तम आहे. वास्तविक, फूटवर्क हे शारीरिक असत नाही तर ते मानसिक असते. जर मनातून सकारात्मक विचार नसतील तर फूटवर्कही साजेसे होणार नाही’, असे सचिन पुढे म्हणाला.

25 वर्षीय लाबुशानेने गतवर्षी 1104 धावांसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान संपादन केले. कन्कशनमुळे स्टीव्ह स्मिथला बदली खेळाडू म्हणून फलंदाजीला उतरल्यानंतर त्याने धुवांधार फटकेबाजी केली. शिवाय, नंतर प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेत 50.42 च्या सरासरीने 353 धावा फटकावल्या. यात सलग चार अर्धशतकांचा देखील समावेश राहिला.

लाबुशानेचे फूटवर्क उत्तम आहे आणि तो मानसिकदृष्टय़ा खंबीर खेळाडू आहे, याचेच ते प्रतिबिंब आहे, असे सचिनचे मत आहे. लाबुशानेने या कसोटी हंगामात 896 धावांची आतषबाजी केली असून त्यात 4 शतकांचा समावेश आहे. दरम्यान, सचिनने विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ यांच्यात कोणता फलंदाज सरस वाटतो, या प्रश्नावर शिताफीने स्पष्ट उत्तर देणे टाळले. लोकांनी माझी तुलना अनेकांशी केली होती. पण, आम्हाला त्यात ओढू नका, असे मी म्हणायचो. आताही विराटबाबत किंवा अन्य फलंदाजांबाबत आमची भूमिका तीच आहे, असे सचिनने पुढे स्पष्ट केले. विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ हे दोघेही क्रिकेट जगताला नवी पर्वणी मिळवून देत आहेत आणि त्यांना तसे करु द्यावे, जेणेकरुन आणखी दर्जेदार खेळ अनुभवता येईल, असे मास्टरब्लास्टर शेवटी म्हणाला.

Related Stories

प्रसंगी रिकाम्या स्टेडियममध्ये…आयपीएल तर होणारच!

Patil_p

क्रिकेटपटूंच्या सामना मानधनात वाढ

Patil_p

आरआरचे दिशांत याज्ञिक दुबईत दाखल

Patil_p

लाबुशानेचे शतक, नटराजनला दुहेरी यश

Patil_p

पाकिस्तानचे पहिले पथक आज इंग्लंडला रवाना

Patil_p

मुश्फिकूर रहिमची विनंती बांगलादेश मंडळाने फेटाळली

Patil_p
error: Content is protected !!