तरुण भारत

राज्यातून थंडी गायब, लागली उन्हाळय़ाची चाहूल

पुणे / प्रतिनिधी :

यंदा थंडीचा दीर्घकाळ, कमी-अधिक प्रमाणातील अनुभव घेतल्यानंतर थंडीने गाशा गुंडाळला असून, राज्यात उन्हाळय़ाची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. पुढील आठवडाभर तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.

Advertisements

राज्यात यंदा पुणे शहर आणि परिसरामध्ये थंडीचा कालावधी वाढला. डिसेंबरच्या थंडीची कसर जानेवारी महिन्याने भरून काढली. जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात थंडीची लाट होती. यानंतर तापमानात चढ-उतार होत राहिले. फेबुवारीच्या पहिल्या आठवडय़ातही रात्रीच्या तापमानात वाढ सुरू झाली. फेबुवारीपर्यंत दिवसाचे कमाल तापमान 30 अंशांच्या खाली होते. 12 फेबुवारीनंतर मात्र, तापमानात वाढ नोंदविली गेली. रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे.

Related Stories

राष्ट्रवादीपुढची आव्हाने

Patil_p

राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरतेचा डाव

Patil_p

पुणे विभागातील 34,055 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

हिंगणघाट : जळीतकांड घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंद

prashant_c

अकोल्यात उद्यापासून सिंचन परिषद

prashant_c

इंग्लंड दौऱयासाठी पाक संघात हैदर अलीला संधी

Patil_p
error: Content is protected !!