तरुण भारत
Image default

त्रालमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

 ऑनलाईन टीम / श्रीनगर :

पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाने शोधमोहिम राबविली. दरम्यान, त्रालमध्ये दहशतवादी लपलेल्या परिसराला घेराव घातल्यानंतर झालेल्या चमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. अद्याप दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असून भारतीय जवानांकडून गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटविल्यानंतर पाककडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहेत. तर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचेही प्रकार वारंवार घडत आहेत. भारतीय लष्कराकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. नुकताच जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Related Stories

एल्गार परिषद : एनआयएच्या ‘एफआयआर’मध्ये देशद्रोहाचे कलमच नाही

prashant_c

‘हायपरलूप’ आपल्याकडे नको : अजित पवार

prashant_c

राष्ट्रवादीपुढची आव्हाने

Patil_p

अरविंद सिंगला आशियाई स्पर्धेत सुवर्ण

Patil_p

मराठा समाजाने ठरवले तर एका दिवसात मस्ती उतरेल

Patil_p

कोल्हापूर : ताम्रपर्णी नदीला पूर, बाजार पेठेत शिरले पाणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!