तरुण भारत

लिट्टी-चोखाचा मोदींनी घेतला आस्वाद

मुख्य स्क्रीन : मेन डिस्प्ले 6.7 इंच पूर्ण एचडी  डायनामिक एमोलेड, 1.1 इंच सुपर डिस्प्ले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

इंडिया गेटवरील हुनर हाटची पाहणी : कुल्हडमधील चहाला पसंती

Advertisements

 इंडिया गेट परिसरात आयोजित हुनर हाटला (कौशल्य प्रदर्शन) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींना पाहून तेथील कारागिर अन् सर्वसामान्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. मोदींनी काही स्टॉल्सना भेट देत कारागिर तसेच सर्वसामान्यांशी संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी कुल्हडमधील चहा पित बिहारचा विशेष खाद्यपदार्थ लिट्टी-चोखाचा आस्वाद घेतला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुख्तार अब्बास नकवी आणि हरदीप पुरी यांनी केले होते.

मोदींच्या दौऱयामुळे प्रदर्शनस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होत. पण सर्वसामान्यांना मोदींशी बोलण्यापासून रोखण्यात आले नव्हते. पंतप्रधानांनी दुकानदार आणि कलाकारांशी चर्चा करत त्यांच्या कौशल्याची माहिती घेतली आहे. ‘कौशल्याला काम’ या ब्रीदवाक्यावर आधारित या प्रदर्शनात देशभरातून शिल्पकार, कारागिर आणि आचारी भाग घेत आहेत. यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिला कारागिरांचा सहभाग आहे. 3 वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून सुमारे 3 लाख कारागिर, शिल्पकार आणि आचारींना रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. प्रदर्शनात 250 पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. हुनर हाटचे आयोजन दिल्ली, मुंबई, प्रयागराज, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, हैदराबाद, पुड्डुचेरी, इंदोरमध्ये झाले आहे. पुढील हुनर हाटचे आयोजन 29 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत रांची येथे तर 13 ते 22 मार्चदरम्यान चंदीगड येथे होणार आहे.

Related Stories

आत्मनिर्भर भारताची नवी भरारी

Patil_p

2 मच्छिमारांच्या हत्येचे प्रकरण बंद

Patil_p

बलात्काराच्या आरोपाखाली ‘या’ माजी मंत्र्याला अटक

Abhijeet Shinde

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 30 मे पर्यंत वाढ : मुख्यमंत्री पिनराई विजयन

Rohan_P

राज्यात विकेंड कर्फ्यू लागू

Patil_p

संपुआचे नेतृत्त्व शरद पवारांकडे?

Patil_p
error: Content is protected !!