तरुण भारत

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून दिलासा

ऑनलाईन टीम / अहमदनगर : 

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या त्या वादग्रस्त किर्तनाचा व्हिडीओ यूटय़ूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर सध्या तरी कुठलीही कारवाई होणार नाही.

Advertisements

दरम्यान, अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने सायबर सेलकडे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिलं होतं. नगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युटय़ूबवर उपलब्ध नसल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांवर सध्या तरी पीसीपीएनडी समितीकडून कसलीही कारवाई होणार नाही. त्यामुळे सध्या तरी इंदुरीकर महाराजांवर कोणतीही कारवाई होणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इंदुरीकर म्हणाले होते की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते. त्यांच्या या हा व्हिडीओनंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका करण्यात आली.

Related Stories

खानापूरमधील एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका

Patil_p

शेतकऱयांनी घेतली प्रादेशिक आयुक्तांची भेट

Amit Kulkarni

रुग्णसंख्येत घट तरीही सीमेवर सतर्कता

Amit Kulkarni

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱया युवकास अटक

Patil_p

नियम पाळा, कोरोनाचा संसर्ग टाळा

Patil_p

अनेक गुन्हय़ांचा छडा, पाणावल्या डोळय़ांच्या कडा

Patil_p
error: Content is protected !!