तरुण भारत

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2663 वर

दक्षिण कोरियात 893 रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 

Advertisements

चीनमध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत 2663 जणांचा बळी घेतला आहे. तर 78 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

चीनपाठोपाठच दक्षिण कोरिया, इटली आणि इराण या देशांनाही करोना विषाणूने विळखा घातला आहे. इराणमध्ये कोरोनाचे आठ बळी नोंदविण्यात आले आहेत. दक्षिण कोरियातही संसर्ग वाढला असून, आणखी 161 रुग्ण नोंदविले आहेत. एकूण रुग्णसंख्या ही 893 वर पोहोचली आहे. या देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

इटलीतही कोरोनाचे 152 संशयित रुग्ण आढळले आहेत. इटलीतील 11 परिसर हे करोना संक्रमित परिसर असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इटलीने कठोर पावले उचलली आहेत. लोंबार्डी परिसरात जास्त कोरोनाचे संशयित आढळले आहेत. इटलीतील जवळपास 50 हजार कुटुंबीयांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सार्वजनिक स्थळी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच करोना संक्रमित विभागात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Related Stories

आहार हवा हृदयस्नेही

Omkar B

लक्षणे लॉंग कॅव्हिडची

Amit Kulkarni

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

हनुमानासन

Omkar B

अँजिओप्लास्टी केल्यानंतर

Omkar B

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कशासाठी

Amit Kulkarni
error: Content is protected !!