तरुण भारत

कलारंगी विश्व रंगले..

कलेने जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो, आपल्या भावभावना, संवेदना कलेतून व्यक्त करताना मिळणारी नवनिर्मितीची अनुभूती समाधान देऊन जाते. जे चित्रासाठीच जगले अशा के.बी.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात आपली कला सादर करण्याचे भाग्य मिळाले हि माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब असल्याचे मत कोल्हापूरचे चित्रकार व शिल्पकार संजीव संकपाळ यांनी व्यक्त केले. एकाच वेळी २०  हून अधिक कलावंताकडून सादर होणार्‍या चित्र प्रदर्शनात त्यांनी रचनाचित्राचे प्रात्यक्षिक सादर करुन के.बी.कुलकर्णी यांना आदरांजली वाहिली.

संकल्पभूमी येथील वातावरण आणि त्या ठिकाणी काम करणारी स्त्री तेथील रंगसंगती यांचा प्रभाव चित्रकलेतून प्रकट करत रचनाचित्र सादर केले. याशिवाय या सोहळय़ाच्या निमित्ताने शिल्पकलाकार म्हणून के.बीं.चा अर्धपुतळा साकारुन या महोत्सवात भेट म्हणून त्यांनी दिला. कोल्हापूरचे कलाकार चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनातून गुरुंसाठी आगळी वेगळी आदरांजली वाहिल्याचे समाधान यामुळे लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरहून के.बी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी बेळगावला येत असे. याशिवाय पुढे पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला, यामुळे आज कलेत मी जो काहि आहे, ते केवळ गुरुंमुळेच. हा सोहळा चित्राचा सन्मान असून शिष्य चित्रकारांच्या माध्यमातून त्यांची कला सदैव जिवंत राहिल असे नमूद केले.

Advertisements

कला हि देवाची देणगी आहे मात्र ती साकारण्यासाठी जिद्द आणि प्रयत्नांची जोड महlवाची आहे. कलेच्या माध्यमातून करीअरच्या अनेक संधी आज उपलब्ध असून मेहनतीतून कला वृद्धीत  होते. गुरुतुल्य व्यक्तीमत्त्व कलामहर्षि 

के.बी.कुलकर्णी यांच्यासाठीच पुण्याहून बेळगावला येऊन कलेचे शिक्षण घेतले असल्याचे मत नामवंत चित्रकार व शिल्पकार जितेंद्र सुतार यांनी व्यक्त केले. ड्रॉइंग हाच कलेचा पाया असून चित्रकला आधी की शिल्पकला, या प्रश्नावर उत्तर नाहि. मात्र ड्रॉइंग  केवळ कलामहर्षींच्या मार्गदर्शनामुळेच  भक्कम झाले असल्याचे सांगत आपला प्रवास आणि कलाविष्कारातील आपले अनुभव व्यक्त केले.

के.बी.कुलकर्णी जन्मशताब्दीच्या निमित्ताने कलामहर्षींचे शिल्प चित्र प्रदर्शनात साकारले. आजच्या पारिस्थितीत सुरु असणारा चित्रकारांचा प्रवास आणि पुढील पिढीला मार्गदर्शन ठरणारे कलेचे पैलू संवादातून व्यक्त केले. चित्रकला उपेक्षित राहते, या प्रश्नावर त्यांनी दृक्श्राव्य असणार्‍या इतर कलांचा प्रभाव अधिक पडतो त्या तुलनेत केवळ दृक्श्राव्य स्वरुपात दिसणाऱ्या चित्राचा प्रभाव राहत नाहि, यामुळे पुढील काळात चित्रकार आपले चित्र सादरीकरणाचे कार्यदेखील करेल असे नमूद केले.

कलाकाराची निर्मिती हि भावनेतून झालेली असते या विषयावर बोलताना जितेंद्र सुतार म्हणाले, भावभावना प्रत्येक मानवामध्ये असतात. कलाकार त्या भावना आपल्यात घेतो आणि दृश्य स्वरुपात तो व्यक्त करतो. यामुळे त्यांची जाणीव, संवदेना प्रत्यक्ष चित्रकार अनुभवतो, त्याच वेळी उत्कृष्ट चित्राकृती सादर होते, असे सांगितले. शिवाय व्यावसायिकतेच्या दृष्टीने या कलांकडे पाहताना `मेहनत करा, सराव करा, पारंगत व्हा, म्हणजे ध्येय पूर्ण होईल, कलेचा विकास कराल!’ असा सल्ला नवोदितांना दिला.

राधिका सांबरेकर

Related Stories

विद्यार्थ्यांना मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते; फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सवाल 

Abhijeet Shinde

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला बेडय़ा

prashant_c

उजनी धरण ठरतेय पक्ष्यांसाठी नंदनवन

Abhijeet Shinde

संघटनेची अनुमती

Patil_p

डिसेंबरपूर्वी राज्यात ग्रा. पं. निवडणूक

Patil_p

नायब तहसीलदार प्रदीप लक्ष्मण पवार यांची शिरस्तेदार पदावर बदली

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!