तरुण भारत

पर्याय ओटसचा

हल्ली बहुतांश लोक ओटसचा वापर न्याहारीसाठी करताना दिसतात. पंजाब आणि हरियाणामध्ये याची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते.

  • ओटस चवदार असतात आणि आरोग्यासाठीही उत्तम असतात.
    ओटसमध्ये विरघळणारे तंतुमय घटक असतात. हे तंतुमय घटक पचण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यामुळेच ओटसचे सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहाते आणि लवकर भूक लागत नाही.
  • प्रथिने आणि तंतुमय घटकांनी युक्त ओटस हे तंदुरूस्तीप्रती, आरोग्यप्रती सजग असणार्या व्यक्तींची आवडती न्याहारी आहे. ओटस् पौष्टिक असतातच शिवाय इतर विविध घटक घालूनही ओटस शिजवता येतात.
  • रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ओटस्ची मदत होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
  • ओटसमध्ये आढळणारी प्रथिने स्नायूंसाठी खूप आवश्यक आहेत. त्याच्या सेवनाने साखरेची पातळी संतुलित राहाते.
  • ओटसमध्ये स्टार्चचे प्रमाण कमीच असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे अतिरिक्त प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते.
  • हृदयाच्या आरोग्यासाठीही ओटस फायदेशीर आहेत. ओटस गोड किंवा खारे अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ तयार करण्यास वापरता येतात.
  • न्याहारासाठी आरोग्यदायी, उत्तम आणि चवदार पदार्थ म्हणून ओटस हा एक चांगला पर्याय आहे.
  • डाएट किंवा पथ्याहार करून वजन नियंत्रित ठेवू इच्छिणार्या व्यक्तींना न्याहारीसाठी पोटभरीचा एक उत्तम पर्याय म्हणून ओटसचा विचार जरूर करू शकतो.

Related Stories

मान दुखत असल्यास

Amit Kulkarni

विविध आजारांवर औषधे घेताना…

Omkar B

सांभाळा गॅस्ट्रोपासून

Omkar B

डेल्टा साठी तिसरा डोस

Amit Kulkarni

विविध गुणांनी युक्त कडुलिंब

Omkar B

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला केंद्र सरकारची परवानगी; पण…

datta jadhav
error: Content is protected !!