तरुण भारत

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बाजारातील तेजीत घसरण

सेन्सेक्स 153.27 अंकांनी तर निफ्टी 69 अंकांनी घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

सत्राच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुरुवातीला बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, ही तेजी शेवटपर्यंत कायम राहिली नाही. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153.27 अंकांनी (0.40 टक्के) घसरत 38,144.02 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी खाली येत 11,132.75 अंकांवर बंद झाला.

कोरोना विषाणू संसर्ग उद्रेकाच्या भीतीमुळे शुक्रवारी जगभरातील बाजारात विक्रमी घसरण नोंदविण्यात आली होती. मात्र, सोमवारी शेअर बाजार तेजीसह सुरू झाले. दिवसभरातील शेवटचे सत्र वगळता बाजार तेजी पाहायला मिळाला. दिल्लीत कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर बाजारातील तेजीत घसरण झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 785 अंकांच्या तेजीसह सुरू झाला. कोरोना विषाणू रुग्ण आढळय़ाच्या वृत्तानंतर सेन्सेक्स 700 पेक्षा अधिक अंकांनी घसरला.

बाजारातील 944 समभागात तेजी तर 1469 समभागात घसरण पाहायला मिळाली. निफ्टीत तेजी घेणाऱया प्रमुख समभागामध्ये एचसीएल टेक, आयशर मोटर्स, नेस्ले, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे. तर घसरणीतील प्रमुख समभागात येस बँक, एसबीआय, टाटा स्टील, गेल आणि हिंडाल्को यांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्र घसरणीच्या स्थरात पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा मिडपॅप आणि स्मॉलपॅप अनुक्रमे 0.3 टक्के आणि 0.7 टक्के घसरणीत होता. 

कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या आठवडय़ात जगभरातील शेअर बाजाराला 5 लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात एक दशकापेक्षा अधिक घसरण झाली आहे. बाजारांना झालेल्या मोठय़ा नुकसानीनंतर अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ जपान आणि रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने धोरणात्मक पावले उचलण्याची तयार केली आहे.

Related Stories

‘पॅनिक बुकिंग’ टाळावे : आयओसी

tarunbharat

आदित्य बिर्लाचाही लवकरच आयपीओ येणार

Omkar B

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

जूनमध्ये इंधनाची 16.29 दशलक्ष टन विक्री

Patil_p

शाओमी इंडियाची जय्यत तयारी

Patil_p

शाओमी ‘एमआय टीव्ही-5’ दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!