तरुण भारत

स्ट्रेस बॉलेचे आरोग्यलाभ

सध्याच्या प्रचंड धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला तणावाला सामोरे जावेच लागत आहे. मात्र हा तणाव व्यक्तीवर स्वार होतो तेव्हा तणावावर उपचार घेण्याची गरज भासू लागते. कारण ताणतणावांमुळेच अनेक आजार बळावत चालले आहेत. बहुतेकदा लोक तणावाच्या व्यवस्थापनासाठी औषधोपचाराची मदत घेतात. मात्र बाजारात मिळणारे स्ट्रेस बॉल्सही तणाव दूर करण्यास मदत करू शकतात. 

  • स्ट्रेसवरील लक्ष विचलित :  सतत एकच विचार, चिंता मनात येत असेल, त्याचाच विचार केला जात असेल तर आपल्यावरील तणाव वाढू लागतो. अशा वेळी स्ट्रेस बॉल आपले लक्ष विचलित करण्याचे काम करतात. चिंता वाटणार्या गोष्टींपासून दूर करत ध्यान एकाग्र करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी मदत करतात. स्ट्रेस बॉलचा असा वापर केल्यास व्यक्तिची उत्पादकताही वाढते.
  • मज्जासंस्थेसाठी लाभदायक: हात, मनगट तसेच आसपास असणार्या नसा या थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. आपण जेव्हा स्ट्रेस बॉलवर दबाव टाकतो तेव्हा त्या नसा आणि स्नायू उत्तेजित होतात आणि आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांची शक्ती वाढते किंवा त्या मजबूत होतात. यामुळे मज्जासंस्थेच्या कार्यात सुधारणा होते आणि तणावाचे नियंत्रण होण्यास मदत होते.
  • इजा होतात बर्या : शरीराला काहीही इजा झाल्यास, जखम झाल्यास स्ट्रेस बॉल्सचा वापर केल्यास फायदा होतो. स्ट्रेस
    बॉलमुळे हाताना होणार्या जखमा थांबवण्यासाठी आणि त्या भरून येण्यासाठी मदत होते. हातांची लवचिकताही वाढवते.
  • संपूर्ण शरीराचा व्यायाम :  स्ट्रेस बॉलचा वापर केल्याने फक्त मनगट किंवा हाताच्या आसपासच्या स्नायूंनाच व्यायाम होतो असे नाही तर अनेक प्रकारे व्यायाम होतो. शरीरातील प्रत्येक रक्तवाहिनी दुसर्या रक्तवाहिनीशी जोडलेली असल्याने स्ट्रेस बॉलचा व्यायाम केल्याने संपूर्ण शरीरातील नसा उत्तेजित होतात. त्यामुळे संपूर्ण शरीरालाच व्यायाम होतो.
  • जीवनाची गुणवत्ता : स्ट्रेस बॉलमुळे तणावाचे व्यवस्थापन होतेच. परंतू जीवनाची गुणवत्ताही सुधारते. तणावाशी लढण्याचा सर्वात सोपा, प्रभावी, नैसर्गिक आणि स्वस्त उपाय आहे.  तणावाचे व्यवस्थापन करू शकलो तर अनिद्रा, हृदयरोग, रक्तदाब यांसारख्या समस्याही आपोआप सहजपणे सुटतात.

Related Stories

ऍलोपथी, आयुर्वेद मिळून औषधाची निर्मिती

Patil_p

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

tarunbharat

फायदे वेट ट्रेनिंगचे

Amit Kulkarni

कोरोनाचा ‘दुसरा हल्ला’

Omkar B

कॅन्सरशी ‘गाठ’ आहे !

Omkar B

दांतारोग्य आणि फ्लोराईड

Omkar B
error: Content is protected !!