तरुण भारत

एन्गिडीचे 6 बळी, ऑस्ट्रेलिया सर्वबाद 271

वृत्तसंस्था/ पोर्ट एलिझाबेथ

येथे सुरु असलेल्या दुसऱया वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीच्या (58 धावांत 6 बळी) भेदक माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 271 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार फिंच व डी शॉर्टची यांची अर्धशतके वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.

Advertisements

प्रारंभी, नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (35) व स्टीव्ह स्मिथ (13) हे स्वस्तात बाद झाले. स्टार फलंदाज लाबुशानेला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार फिंच व डी शॉर्ट यांनी चौथ्या गडयासाठी 77 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. फिंचने 87 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 69 धावा फटकावल्या.  डी शॉर्टने 5 चौकारासह 69 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने 45 चेंडूत 36 तर ऍलेक्स केरीने 21 चेंडूत 21 धावा फटकावल्याने ऑसी संघाला अडीचशेचा टप्पा गाठता आला. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल लोटांगण घातल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 271 धावांत आटोपला. आफ्रिकेकडून एन्गिडीने सर्वाधिक 6 तर नोर्तजने 2, पेहलुकवियो, शाम्सीने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत सर्वबाद 271 (वॉर्नर 35, फिंच 69, डी शॉर्ट 69, मार्श 36, केरी 21, एन्गिडी 58 धावांत 6 बळी, नोर्तजे 2/59).

Related Stories

इटलीत रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

अश्रफचे नाबाद अर्धशतक, नॉर्जेचे 5 बळी

Patil_p

नरसिंग यादवसह दोन मल्लांना कोरोना

Patil_p

भारत-बेल्जियम पहिला सामना आज

Patil_p

टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेत चार मुष्टीयोद्धय़ांचा समावेश

Patil_p

पहिला वनडे सामना लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!