तरुण भारत

‘व्होडाफोन आयडिया’चे टर्बोनेट 4जी

प्रतिनिधी / पुणे :

भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा कंपनी असलेल्या ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘टर्बोनेट 4जी’ सादर करण्याची घोषणा केली.

Advertisements

पुणे आणि पिंपरी-चिंचवडबरोबरच महाराष्ट्र व गोवा परिमंडळातील नाशिक, नागपूर, अहमदनगर, बारामती, बीड, कराड, गोंदिया आणि रत्नागिरी या शहरांत, तसेच उस्मानाबाद, हिंगोली, नंदुरबार, परभणी, भंडारा, वर्धा, यवतमाळ व वाशिम या जिल्हय़ांमध्येही ‘टर्बोनेट 4जी’ मिळू लागले आहे. ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’चे महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे व्यवसायप्रमुख राजेंद्र चौरसिया म्हणाले, ‘महाराष्ट्र व गोवा परिमंडळातील ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यादृष्टीनेच आम्ही आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्होडाफोन आयडिया नेटवर्क अधिक मजबूत केले आहे. ‘टर्बोनेट 4जी’च्या माध्यमातून हे नेटवर्क इनडोअर कव्हरेजसह अतिजलद बनविण्यात आले आहे. आम्ही इतर शहरांमध्ये व गावांमध्येही ‘टर्बोनेट 4 जी’ लवकरच आणणार आहोत. महाराष्ट्र आणि गोव्यातील 37 जिल्हय़ांमधील 4 कोटींहून अधिक ग्राहक या मजबूत एकत्रित नेटवर्कचा आणि समृद्ध डिजिटल सामग्रीचा आनंद आता घेऊ शकतील. व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशांत व्होरा म्हणाले, उत्कृष्ट नेटवर्कचा अनुभव ग्राहकांना मिळवून देण्यावर व्होडाफोन आयडियाने नेहमीच लक्ष केंद्रीत केलेले आहे.

Related Stories

एचडीएफसी बँक मेडिकल सुविधांसाठी करणार मदत

Patil_p

हेक्सागॉन न्युट्रीशनचा येणार आयपीओ

Patil_p

आरबीआयच्या बैठकीनंतर बाजारात तेजी

Patil_p

हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेट पुन्हा तोटय़ात

Patil_p

स्मार्टफोन शिपमेंट 16 कोटींपेक्षा कमीच राहणार?

Amit Kulkarni

प्रथमच 12 लाख टन जीएम सोयाबीन आयात करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!