तरुण भारत

स्टेट बँक लवकरच येस बँकेची हिस्सेदारी घेणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेची विक्री करण्यासाठी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला पुढाकार घेण्यास राजी केले आहे. याबरोबरच समभाग खरेदीसाठी एसबीआयच्या योजनेलाही सरकारने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती ब्लूमबर्ग मीडीया अहवालामधून देण्यात आली आहे. त्यामुळे येस बँकेतील हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येस बँकेतील हिस्सेदारी खरेदी करणारे कंसोर्शियमला एसबीआय पुढाकार घेणार आहे. या माहितीमुळेच एनएसईमधील येस बँकेचे समभाग 26 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला एसबीआयच्या समभागांमध्ये 5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. खालील पातळीवर खरेदीचे वातावरण राहिल्यानंतर 3.5 टक्क्यांनी समभाग वधारल्याचे पहावयास मिळाले आहे. 

आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेला  जुलै-सप्टेंबर तिमाहीत 629 कोटीचा तोटा झाला आहे. डिसेंबर तिमाहीचा अहवाल सोडून मागील महिन्यात बँकेनी सांगितले होते की 14 मार्चपर्यंत तिमाही अहवाल सादर करणार असल्याचे म्हटले  होते. बँक मागील एक वर्षापासून अडचणींचा सामना करत आहे.  रिझर्व्ह बँकेने 2018 मध्ये येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमोटर राणा कपूर यांचा कार्यकाळ घटविला होता. बँकेचे समभाग किंमत ऑगस्ट 2018 मध्ये 400  रुपये होते. ते सध्या 35 रुपयाच्या जवळपास आहे. बँकेचे बाजारीमूल्य 8,888.40 कोटी रुपये आहे. प्रमोटर शेअरहोल्डिंग डिसेंबर 2019मध्ये घटून 8.33 टक्क्यांवर राहिली आहे. 

Related Stories

अशोक लेलँडचा नवा ट्रक

Patil_p

सोने आयात 99 टक्क्यांनी घटली

Patil_p

थेट ग्राहकांपर्यंत ब्रँड पोहोचविणे कार्य तेजीत

Patil_p

नवीन आर्थिक वर्षात सेन्सेक्सची दमदार सुरूवात

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यू 2009 नंतर पहिल्यांदा नुकसानीत

Patil_p

एसबीआयची शापुरजी पालनजी सोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!