तरुण भारत

आयुर्वेद रुग्णालयात अतिदक्षता विभाग

सुरुवातीला 20 खाटा, भविष्यात होणार विस्तार

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

सिंधुदुर्गातील रुग्णांना आता गोवा राज्यात उपचारासाठी धावपळ करावी लागणार नाही. अपघात वा अन्य इमर्जन्सी रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग येथील राणी जानकीबाई सुतिकागृह संस्थेत लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक उमाकांत वारंग, प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील उपस्थित होते. सावंतवाडी नगरपालिकेने हेल्थ फार्म आयुर्वेद महाविद्यालयाला चालविण्यास दिल्यास कुठल्याही क्षणी पंचकर्म विभाग सुरू करू, असेही ते म्हणाले.

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात 35 डॉक्टर आहेत. तसेच गोवा, बेळगाव, कोल्हापूर येथून तज्ञ डॉक्टरही तपासणीसाठी येतात. सिंधुदुर्गात आरोग्यसेवेची ओरड आहे. मात्र, आयुर्वेद महाविद्यालयात उत्तम आरोग्य सेवा दिली जात आहे, असे ऍड. नार्वेकर म्हणाले.

100 खाटांचा अतिदक्षता विभाग

सिंधुदुर्गात अतिदक्षता विभाग नसल्याने अपघात वा हृदयविकाराच्या रुग्णांना गोवा येथे हलवावे लागते. मात्र, काही रुग्ण वाटेतच दगावतात. त्यामुळे आता महाविद्यालय परिसरात 100 खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे.  हा विभाग गोवा येथील डॉ. दिगंबर नाईक व त्यांचे सहकारी चालविणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 20 खाटांचे रुग्णालय सुरू होणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.

हेल्थ फार्म चालविण्यास तयार

सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयाला हेल्थ फार्म सुरू करण्यासाठी माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांनी निधी दिला होता. मात्र, तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी हा निधी पालिकेकडे वळवत हेल्थ फार्म उभारले. हे हेल्थ फार्म आम्हाला चालवायला द्या, अशी मागणी केली होती. हेल्थ फार्म पालिकेला चालविणे अशक्य आहे. पालिकेने भाडे कमी करून पूर्णपणे आमच्याकडे हस्तांतरित केल्यास आम्ही ते तात्काळ सुरू करू, असेही ऍड. नार्वेकर यांनी सांगितले.

आठ मार्चला महिलांची मोफत तपासणी

राणी जानकीबाई संस्थेत येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण शहरातील महिला रुग्णांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सकाळी 11 ते 3 या वेळेत केली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍड. नार्वेकर यांनी केले.

Related Stories

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन

Ganeshprasad Gogate

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी प्रवेश अटीत शिथिलता

Patil_p

‘कोरे’ मार्गावर 2 पासून राजधानी एक्स्प्रेस धावणार

NIKHIL_N

दापोली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मनोज भांबीड बिनविरोध

Abhijeet Shinde

एसटी धावतेय प्रवाशांविनाच

NIKHIL_N

रत्नागिरी शहरात समावेशासाठी काही ग्रामपंचायतींचा होकार

Patil_p
error: Content is protected !!