तरुण भारत

फिफा वर्ल्डकप पात्रता स्पर्धाही लांबणीवर

झुरिच

2022 विश्वचषक व 2023 आशियाई चषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामने लांबणीवर टाकण्याचा प्रस्ताव फिफाने सादर केला. यात भारतात होणाऱया कतारविरुद्ध चाचणी लढतीचाही समावेश आहे. फिफा व आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणीने यावेळी जागतिक फुटबॉल संघटनेच्या मुख्यालयात आशियाई फुटबॉल उपक्रमांबद्दल चर्चा केली. भारतीय फुटबॉल संघ विश्वचषकासाठी पात्र होणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले असले तरी भुवनेश्वरमध्ये दि. 26 मार्च रोजी कतारविरुद्ध भारताची पात्रता लढत होणार आहे आणि त्यानंतर जूनमध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध सामने होतील. मात्र, कोरोना विषाणूमुळे या सर्व सामन्यांवर अनिश्चिततेचे सावट आले आहे. भारतीय फुटबॉल संघासमोर सध्या 2023 आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्रता संपादन करण्याचे लक्ष्य आहे.

Advertisements

Related Stories

यू-19 विश्वचषकसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

एटीपी मानांकनात मेदव्हेदेव दुसऱया स्थानी

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात

Patil_p

यंदाची प्रो कबड्डी लीग स्पर्धा रद्द

Patil_p

ऍशेस मालिकेतील शेवटची कसोटी आजपासून

Amit Kulkarni

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!