तरुण भारत

सौदी अरेबियात 3 राजपुत्रांना अटक

रियाध

 सौदी अरेबियाच्या अधिकाऱयांनी दोन राजपुत्रांसह तीन सदस्यांना सत्तात्तंराचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या कारवाईद्वारे युवराजाने सत्तेवरील स्वतःची पकड मजबूत झाल्याचा संकेत दिला आहे. राजघराण्याच्या सुरक्षा पथकाने शाह सलमान यांचे बंधू राजपुत्र अहमद बिन अब्दुल अजीज अल-सौद आणि पुतण्या राजपुत्र मोहम्मद बिन नाएफ यांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.सत्तास्थानाचे संभाव्य दावेदार राहिलेल्या व्यक्तींवर ‘युवराजांना हटविण्यासाठी सत्तात्तंराचा कट’ रचल्याचा आरोप न्यायालयाने ठेवला असून त्यांना जन्मठेप किंवा मृत्युदंड ठोठावला जाऊ शकतो.

 84 वर्षीय राजे सलमान यांच्याकडून औपचारिक सत्ता हस्तांतरणापूर्वी अंतर्गत असंतोष संपुष्टात आणण्याच्या मार्गावर युवराज सलमान असल्याचे दिसून येत आहे. राजपुत्र अहमद हे जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर लंडन येथून सौदी अरेबियात परतले होते. राजेशाहीसाठी समर्थन प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे मानले गेले होते. जून 2017 मध्ये सलमान यांनी नाएफ यांना पदावरून दूर करत अरब देशाच्या सत्तेवर पकड निर्माण केली आहे.

Advertisements

Related Stories

इटलीतील ‘शतायू’ गाव

Patil_p

अलिबाबचे जॅक मा बेपत्ता

Patil_p

वुहानमध्ये ‘10 दिवसांची लढाई’

Patil_p

इटलीत 6 कोटी लोक घरात कैद

tarunbharat

‘पराभव झाला तर देश सोडावा लागेल’

Patil_p

चीनमधील ‘या’ निकृष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात थांबणार

datta jadhav
error: Content is protected !!