तरुण भारत

जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढय़

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम :  2009 मध्ये या प्रकारची स्थिती राहिली होती

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

भारतीय उद्योगपत्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता आशियातील सर्वात धनाढय़ व्यक्ती राहिले नाहीत. तर त्यांना श्रीमतांच्या स्पर्धेत मागे टाकत चीनचे उद्योगपत्ती आणि अलीबाबा गुपचे संस्थापक जॅक मा यांनी आशियातील सर्वात धनाढय़ बनत सर्वोच्च स्थान पटकवले आहे.

तेलाच्या किमतीमध्ये आलेली घसरणीसह जागतिक बाजारात झालेली घसरण यामुळे भारतात श्रीमंतामध्ये प्रथम स्थानी असणारे मुकेश अंबानी यांची संपत्ती 5.8 अब्ज डॉलरने घटून 41.9 अब्ज डॉलरवर  (2.93 लाख कोटी रुपये) स्थिरावली आहे. या आकडेवारीनंतर आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी दुसऱया स्थानी घसरले आहेत. तर जॅक मॉ यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. 

आशियातील सर्वाधिक धनाढय़ असणाऱयांमध्ये चीनचे जॅक मा मुख्य स्थानी राहिले आहेत. त्यांची संपत्ती 44.5 अब्ज डॉलर (3.11 लाख कोटी रुपये) आहे.  तर दुसऱया बाजूला मुकेश अंबानी यांची संपत्ती 2.6 अब्ज डॉलरपेक्षा (18,200 कोटी रुपये) अधिक आहे. अशी माहिती ब्लूमबर्ग बिलियनेयर्सच्या निर्देशांकामध्ये दिली आहे.

रिलायन्सचे समभाग कोसळले

आंतरराष्ट्रीय बाजारामधील घसरणीमुळे सोमवारी रिलायन्सचे समभाग 12 टक्क्यांनी कोसळले आहेत. अशी स्थिती 2009 मध्ये झाली होती.

Related Stories

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीची झुळूक

Patil_p

बिटस् पिलानीच्या उमेदवारांना सर्वोत्तम पॅकेज

Patil_p

आयसीआयसीआय देणार कोटीपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

Patil_p

देशामध्ये नवीन आठ खासगी बँका होणार सुरू

Patil_p

मॅप माय इंडियाचा येणार आयपीओ

Patil_p

गौतम अदानी राहिले तिसऱया स्थानी

Patil_p
error: Content is protected !!