तरुण भारत

लूनर डाएट म्हनजे काय ?

पथ्याहार किंवा डाएटचे विविध प्रकार सध्या प्रचलित आहेत. वजन वेगाने कमी करण्यासाठी किटो, वेगन, लिक्विड आदी डाएटची चलती सध्या आहेच. याच रांगेत आता आले आहे लूनर डाएट. त्याला मून डाएटही किंवा वेअरवूल्फ डाएट असेही म्हतात. हॉलीवूड अभिनेत्री डेमी मूर आणि मॅडोनासारख्या अभिनेत्री हे डाएट फॉलो करतात. काय आहे हा डाएट प्लॅन?

कसा करायचा उपवास?

Advertisements
 • लूनर डाएटमध्ये व्यक्तीला अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवसांत उपवास करायचा असतो. या काळात कोणतेही घन अन्नपदार्थ सेवन करायचे नाहीत.
 • तज्ञांच्या मते ही आहारपद्धती कोणत्याही व्यक्तीची वजन कमी करण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देते.
 • या डाएटच्या मदतीने कोणतीही व्यक्ती 26 तासांत सहजपणे आपले सहा पौंड म्हणजे 2.7 किलोग्रम पर्यंत वजन कमी करू शकते.

पथ्याहाराचे नियमः

 • मून डाएटचे पालन करणार्यांनी अमावस्या किंवा पौर्णिमा यांच्या 26 तासांदरम्यान केवळ पाणी आणि डीटॉक्स टी घ्यावा.
 • यादरम्यान भाज्या आणि फळे यांच्या रसाचे सेवन करू शतात. जड पदार्थ, साखर आणि मेद यांचे सेवन व्यर्ज करावे.
 • तज्ञांच्या मते, चंद्र आपल्या शरारीतील पाण्यालाही समुद्राच्या पाण्यात जशा लाटांची निर्मिती करतो त्याप्रमाणे प्रभावित करतो. चंद्राच्या त्याच शक्तीचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 • चंद्राचे गुरूत्वाकर्षण पौर्णिमा आणि अमावस्येदरम्यान सर्वाधिक शक्तिशाली असते. त्यामुळे या काळात जर पेय पदार्थांचेच सेवन केले तर वजन कमी करण्यास मदत होते.
 • सावधगिरी गरजेची
 • लूनर डाएटमुळे अशक्तपणा, थकवा किंवा चक्कर येणे आदी समस्या होऊ शकतात. कारण घन किंवा जड पदार्थ यांचे सेवन केलेले नसते.
 • त्याव्यतिरिक्त चिडचिड, बेशुद्ध होणे किंवा संवेदनाशून्य होणे आदी समस्याही होऊ शकतात.
 • हायपोग्लायकिमिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे लूनर डाएट करण्यापूर्वी आपल्या प्रकृतीचा अंदाज घ्या आणि तज्ञांना विचारल्याशिवाय कोणत्याही डाएटच्या मागे लागू नका.

Related Stories

हाता पायाला मुंग्या येत आहेत

Amit Kulkarni

रेमडेसिव्हर घेताय

Amit Kulkarni

जलोदुरनाशक मुद्रा

Omkar B

नवा प्रकार नवा धोका

Amit Kulkarni

कोरोना काळात काय टाळावे

Amit Kulkarni

फायदे वेट ट्रेनिंगचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!