तरुण भारत

पर्यटन उद्योगावर कोरोनाचा परिणाम

पर्यटक रोडावले हॉटेल उद्योगास फटका चार्टर विमाने, जहाजे स्थगित

प्रतिनिधी/ पणजी

देशातील वाढता कोरोना विषाणूंचा संसर्ग, वाढणारे रुग्ण या सर्व गोष्टींचा परिणाम गोव्यातील पर्यटनावर झाला असून अनेक पर्यटकांचे गोवा बेत रद्द झाले आहेत. विमानातून येणाऱया पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. गोव्याकडे येणारी चार्टर विमानेही स्थगित झाली आहेत. पर्यटक जहाजांनाही बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल उद्योगास त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल्सची आरक्षणे स्थगित करण्यात आली आहेत.

गोवा ट्रव्हल्स आणि टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मिसाईस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंचा मोठा परिणाम गोव्यातील पर्यटन, पर्यटकांवर झाला असून त्यासाठी सरकारला दोष देता येणार नाही, तर परिस्थिती वस्तुस्थितीला तसेच आरोग्य जागृती यास दोष देण्याशिवाय पर्याय नाही. संपूर्ण जगात व देशातही पर्यटनाबाबत अशीच मंदी आहे.

गोवा अजूनही पर्यटनास सुरक्षित

दाबोळी विमानतळावर फारच कमी संख्येने प्रवासी पर्यटक दिसतात आणि तेथील गजबजाटही कमी झाला आहे. देशातील इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत व त्याचे अहवालही सकारात्मक येत आहेत. गोव्यात सुदैवाने एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे गोवा पर्यटनासाठी अजूनही सुरक्षित असल्याचा दावा मसाईस यांनी केला आहे आणि सरकारने या मुद्दय़ावर भर देऊन पर्यटनाची प्रसिद्धी करावी, असे ते म्हणाले.

एप्रिल-मे मधील पर्यटनावरही परिणाम शक्य

एप्रिल-मे अशी सुमारे दोन महिने शाळांना उन्हाळा सुट्टी असते. त्यामुळे अनेक पर्यटक मुलांसह गोव्यात येतात. त्यांचे आरक्षणही सध्या फारसे होताना दिसत नाही. त्यामुळे हॉटेल्स, पर्यटन व्यवसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा धसका जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत परिस्थिती बदलेल असे वाटत नाही, असेही असोसिएसनच्या सूत्रांनी सांगितले.

गोव्यातून देशातील इतर राज्यातील तसेच परदेशात सहलीसाठी जाणाऱयांनी देखील आपले बेत रद्द केले असून आरक्षणाची मिळतील तेवढी रक्कम परत मिळविण्याची धडपड सुरू केली आहे, अशी माहिती असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

Related Stories

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ

Omkar B

पक्षीय पातळीवर न लढण्याचा दिला होता सल्ला

Patil_p

खाणी सुरु करा, अन्यथा अवलंबितांची जाबाबदारी घ्या

GAURESH SATTARKAR

वाळके खून प्रकरणी तिघांना बिहारमधून अटक

Patil_p

जुने गोवे येथे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Amit Kulkarni

पुढील 60 दिवस फार काळजीचे

Omkar B
error: Content is protected !!