तरुण भारत

सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसात शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. शेअर बाजारातील घसरणीनंतर कमोडिटी बाजारात आज सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण झाली.

Advertisements

आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 3100 अंकांनी कोसळला. त्यानंतर सोन्याच्या दरातही 2600 रुपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव 41 हजार 600 रुपयांवर आला आहे. गुरुवारी सोने 128 रुपयांनी स्वस्त होऊन 44 हजार 490 रुपयांवर पोहचले होते. आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाचा प्रभाव मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीवर पडत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहेत.

Related Stories

2020-21 साठी 1.19 कोटी प्राप्तीकर रिटर्न फाईल दाखल

Amit Kulkarni

लसीकरणानंतर अर्थव्यवस्था सुधारेल

Patil_p

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

Abhijeet Shinde

देशात जवळपास 10 हजार नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण

Patil_p

लॉकडाऊन वाढ अर्थव्यवस्थेला धोक्मयाची

Patil_p
error: Content is protected !!