तरुण भारत

कोरोनाच्या धास्तीने ब्रिटिश एअरवेज कर्मचारी कपात करणार

जगामध्ये तिसऱया क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी : सीईओ अलेक्स क्रूझ यांची माहिती

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisements

कोरोना व्हायरसचा धसका ब्रिटिश एअरवेज या जगातील तिसऱया क्रमांकाच्या मोठय़ा प्रवासी विमान वाहतूक कंपनीने घेतला असून या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अलेक्स क्रूझ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोना व्हायरसमुळे विमान प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे अनेक विमान कंपन्या तोटय़ात चालल्या असून कर्मचारी कपात करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. कोरोनाचा प्रसार रोखणे तसेच कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढणे अशा दोन्ही उद्देशांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आमच्यासाठी सुखावह नाही. युरोपमध्ये उन्हाळय़ात पर्यटनासाठी सर्वोत्तम वातावरण असते. नेमक्मया याचवेळी कोरोनाचा उदेक झाल्याने आम्हाला या संपूर्ण पर्यटन मोसमावर पाणी सोडावे लागण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. आमच्या कंपनीप्रमाणेच इतरही प्रसिद्ध कंपन्यांना फटका बसला आहे, असे व्यथित उद्गार क्रूझ यांनी काढले.

इटलीतील हाहाकार सुरूच

युरोप खंडामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला सहन करावा लागत आहे. आतापर्यंत या देशात दहा हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून मृत्यूंची संख्या 600 च्या वर पोहोचली आहे. संपूर्ण देशच बंद करण्याची वेळ सरकारवर आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली असून सहा कोटी लोक गेले दोन दिवस अत्यावश्यक कारणे सोडून अन्य कोणत्याही निमित्ताने घराबाहेर पडलेले नाहीत, असे सांगण्यात आले. अशी अभूतपूर्व परिस्थिती दुसऱया महायुद्धाच्या काळातही उद्भवली नव्हती, असे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत.

फ्रान्समध्येही बळींची संख्या 43 वर पोहोचली असून 227 जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 100 जणांची प्रकृती सुधारत असल्याने ते धोक्मयाबाहेर आहेत. ब्रिटनमध्येही पाच मृत्यू ओढवले असून कोरोनाची लागण झालेल्या 50 हून अधिक व्यक्तींवर उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

उत्तरप्रदेश : कार-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 ठार

datta jadhav

दिल्लीत रविवारी 6,456 नवीन कोरोना रुग्ण; 262 मृत्यू

Rohan_P

देशात 28,903 रुग्णांची वाढ

datta jadhav

ओसामा अन् ओवैसी यांच्यात जवळीक

Patil_p

कोरोना मृतांच्या आकडय़ात घट

Patil_p

भाजप खासदाराच्या विरोधात तृणमूलचे पोस्टरवॉर

Patil_p
error: Content is protected !!