तरुण भारत

18 सप्टेंबरला रिलीज होणार फरहानचा ‘तुफान’

अभिनेता फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला ‘तुफान’ हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी

प्रदर्शित होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात तो मुष्टीयोद्धय़ाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातही फरहान अख्तरची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. ‘तुफान’ या चित्रपटाची तयारी सुरू झाल्यापासून फरहान अख्तर बॉक्सिंग प्रशिक्षणाचे अनुभव, फोटोज शेअर करत आहे. या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. या भूमिकेत कोणतीही उणीव राहू नये यासाठी त्याने बरीच तयारी केली आहे. या चित्रपटात परेश रावल, मृणाल ठाकुर आणि इशा तलवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Advertisements

Related Stories

सोनाली कुलकर्णीचे भावासोबत ‘या’ क्षेत्रात पदार्पण

Abhijeet Shinde

क्रितीने पूर्ण केले ‘मिमी’चे शूटिंग

tarunbharat

मयूर वैद्य रमलाय कथ्थकच्या रियाजात

Patil_p

आमिर खान-किरण राव १५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त

Abhijeet Shinde

पौलोमी पाविनी फोर्ब्सच्या यादीत

Amit Kulkarni

भूताचा नवा खेळ द कॉन्ज्युरिंग 3

Patil_p
error: Content is protected !!