तरुण भारत

काँग्रेसला गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंगची भीती

जयपूर

 मध्यप्रदेशच्या राजकीय नाटय़ादरम्यान आता गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांना अन्य राज्यांमध्ये हलविले जाणार आहे. या आमदारांना जयपूर किंवा रायपूर येथे हलविण्यात येणार आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी भाजपच्या 3 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरला आहे. भाजपने 3 उमेदवार दिल्याने काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती सतावत आहे.

गुजरात विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या पाहता राज्यसभेतील एक जागा  गमवावी लागू शकते. पण काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी काँग्रेसने पाटीदार उमेदवार दिला नसल्याने पक्षात नाराजी असून भाजपला याचा लाभ होणार असल्याचे विधान केले आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागणार असल्याचा दावा काँग्रेस नेते भरतसिंग सोलंकी यांनी केला आहे.

180 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 103 आमदार आहेत. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 तसेच बीटीपीच्या दोन आमदारांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे 73 आमदार असून अपक्ष जिग्नेश मेवाणी यांच्या पाठिंब्यामुळे संख्याबळ 74 वर पोहोचले आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे. अशा स्थितीत भाजपला 2 तर काँग्रेसला एका जागेवर सहजपणे विजय मिळणार आहे. चौथ्या जागेवरील निर्णय दुसऱया क्रमांकाच्या प्राधान्यमताद्वारे होणार आहे.

Related Stories

उत्तराखंड : कोरोनाग्रस्त रुग्णांनी ओलांडला 31 हजारांचा टप्पा

pradnya p

आमदार थांबलेल्या रिसॉर्ट विरोधात एफआयआर

Patil_p

आत्मसन्मानाला धक्का सहन करणार नाही!

Patil_p

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर 

prashant_c

ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

datta jadhav

जम्मू काश्मीर : मनोज सिन्हा यांनी घेतली उपराज्यपाल पदाची शपथ

pradnya p
error: Content is protected !!