तरुण भारत

बिल गेट्स यांचा आता समाजकार्याकडे ओढा

मायक्रोसॉफ्ट संचालक मंडळाचा दिला राजीनामा


वॉशिंग्टन

Advertisements

स्वतःला समाजकार्यात गुंतवण्याच्या उद्देशाने बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.  परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत. बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचे आहे, त्यामुळेच त्यांनी काही जबाबदाऱया सहकाऱयांवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचाही समावेश आहे. “मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत,’’ अशी माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली.

Related Stories

अमेरिकेकडून 6 लाखाहून अधिक लसींचा नेपाळला पुरवठा

Patil_p

जग फिरून चिमुकला करतोय मोठी कमाई

Amit Kulkarni

श्रीलंकेत राजपक्षे बंधूंची बाजी; पंतप्रधान कोण?

datta jadhav

‘स्टडी ड्रग्स’ सेवन करत देतात परीक्षा

Patil_p

सुडोकूचा गॉडफादर हरपला माकी काजी यांचे निधन

Patil_p

अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला बळी

Patil_p
error: Content is protected !!