तरुण भारत

‘एसबीआय कार्ड्स’ लिस्टिंगवर कोरोनाची छाया

13 टक्क्यांच्या सवलतीसह 658 रुपयांवर सूचीबद्ध : आयपीओला 26 पट अधिक बोली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील दुसऱया क्रमांकाची पेडिट कार्ड जारी करणारी कंपनी एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या सूचीबद्धतेवर मोठय़ा प्रमाणात घसरलेल्या बाजाराचा परिणाम झाला. एसबीआय कार्ड्सचा आयपीओ शेअर बाजारात कमकुवत सूचीबद्ध झाला. मुंबई शेअर बाजारात 755 रुपये इश्यू प्राईजच्या तुलनेत 658 रुपयांवर सूचीबद्ध झाला आणि 13 टक्क्यांची सवलत देण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजारात 12.45 टक्के सवलतीसह 661 रुपयांच्या किंमतीवर सूचीबद्ध झाला. हा आयपीओ 2 ते 5 मार्च रोजी वर्गणीसाठी खुला होता. शेअर बाजारात या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, 26 पट अधिक बोली मिळाली.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, अ‍Ÿक्सिस कॅपिटल, डीएसपी मेरिल लिंच, एचएसबीसी सिक्मयुरिटीज ऍण्ड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), नोमुरा फायनान्शयिल ऍडव्हायझरी ऍण्ड सिक्मयुरिटीज (इंडिया) आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स या आयपीओचे व्यवस्थापक होते.

भागधारकांसाठी स्वतंत्र कोटा

एसबीआय कार्डचा 19 शेअर्सचा लॉट साईज होता. या आयपीओमध्ये एसबीआय समभागधारकांसाठी काही समभाग राखीव ठेवण्यात आले होते. एसबीआयच्या भागधारकांना 1.30 कोटी समभाग वाटप करण्यात आले. अशा प्रकारे एसबीआयने आपल्या भागधारकांसाठी स्वतंत्र कोटा आरक्षित केला होता.

आयपीओची बम्पर लिस्टिंग?

आयपीओबाबत गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवसापर्यंत या आयपीओला 26.5 पटीपर्यंत बोली लागली होती. आयपीओला पहिल्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी 38.87 टक्के बोली मिळाली होती. यासाठी प्राईज रेंज 750-755 रुपयांच्या दरम्यान ठेवली गेली. आयआरसीटीसीप्रमाणे एसबीआय कार्डच्या आयपीओची बम्पर लिस्टिंग होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Related Stories

मारुती आल्टोच्या विक्रीचा आकडा 40 लाखाच्या घरात

Patil_p

एअरटेल पेमेंट बँकेची कार विमा सेवा

Omkar B

कोळसा उद्योगातील सुधारणांसाठी 50 हजार कोटी

datta jadhav

कोळसा उत्पादनाचे ध्येय कायम ठेवा

Patil_p

कोरोना : चीनमध्ये मृतांचा आकडा 425 वर

prashant_c

जागतिक स्मार्टफोन उत्पादनात वाढ

Patil_p
error: Content is protected !!