तरुण भारत

सुसधूर ताकाची डेऱयातील घुसळण

उन्हाळय़ाच्या दिवसात थंडगार असे पेय पिण्याची हौस भागवून घेण्याची अनेकांची धडपड सुरू असते. मात्र, बाटलीबंद आणि महागडय़ा अशा शीतपेयांपेक्षा ताजे थंडगार ताक शरीरासाठी अत्यंत हितवर्धक ठरते, असे आरोग्यशास्त्र सांगते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पारंपरिक पद्धतीने डेऱयामध्ये दही घुसळून तयार होणारे ताक आता येथे येणाऱया नागरिकांची तहान भागवित आहे.

उन्हाचा वाढता प्रकोप सध्या साऱयांना त्रस्त करतो आहे. अशावेळी अनेक ठिकाणी होणारी शीतपेयांची विक्री ग्राहकवर्गाचे लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे तहानलेल्या जीवाला गारवा लाभावा, यासाठी शीतपेयांकडे ओढा वळणे स्वाभाविकच. त्यामध्ये ताकासारखे आरोग्यदायी सुमधूर पेय अनेकांना भुरळ घालते. येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सध्या असलेल्या डेऱयातील ताकाची विक्री ग्राहकांची गर्दी खेचत आहे. बर्फ किंवा कोणत्याही कृत्रिम पर्यायांचा वापर न करता सुमधूर आणि अस्सल चवीच्या ताकाची गोडी येथे चाखता येते. त्यामधून मन तृप्त होते, असे ग्राहकवर्ग कबूल करतो.

Advertisements

नाविन्यपूर्ण असा काही उद्योग चालविण्याची अपेक्षा आणि भर उन्हाचा मारा असूनही कष्टाची तयारी यांचा समतोल साधत राजेश काकडे यांनी हा आपला छोटेखानी उद्योग सुरू केला आहे. ग्राहकांना आरोग्यदायी असे ताक देऊन आपल्यालाही समाधान मिळते. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने डेऱयामध्ये घुसळण करून मिळणारे ताक ग्राहकांना निश्चितच आकर्षित करून घेते. त्याचप्रमाणे त्यांची तहान भागवून आरोग्यदायी पेय पिल्याचे मानसिक समाधान देते. त्यामधून मिळणाऱया रकमेपेक्षा आपल्याला ग्राहकांचे समाधानच अधिक आनंद देणारे आहे, असे काकडे यांनी सांगितले.

राजेश काकडे यांच्या या उद्योगामध्ये त्यांची पत्नी आरती काकडे या त्यांना सोबत करतात. सध्या सुरू असलेल्या रोगराईच्या दिवसात आरोग्यपूर्ण असे काही मिळण्याची खात्री नसताना हा प्रयोग आगळा ठरतो आहे. डेऱयातील ताकाची सुमधूर चव आरोग्याच्यादृष्टीने परिपूर्ण आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

महात्माजींचे महान विचार

Patil_p

कौटुंबिक अर्थसंकल्प

Patil_p

सुवर्णा म्हेत्रे यांचे निधन

Abhijeet Shinde

सरकारी शाळा क्र. 45 नार्वेकर गल्ली

Patil_p

ऊर्जा सकारात्मकतेचा

tarunbharat

निसर्ग हाच सोबती

Patil_p
error: Content is protected !!