तरुण भारत

एप्रिल-फेब्रुवारीत सोने आयातीत घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोने आयात चालू व्यापारी वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत जवळपास 8.86 टक्क्यांनी घटून 27 अब्ज डॉलर (1.90 लाख कोटी रुपये) राहिली आहे. मागील व्यापारी वर्षात समान कालावधीत भारतात 29.62 अब्ज डॉलर सोन आयात झाली होती. चालू खात्यातील तूटीमुळे सोन आयात हा देशातील चर्चेचा विषय बनला होता. यासाठी मोठय़ा प्रमाणात भारतामधून विदेशी चलन बाहेर जात असते.यासाठी सरकार सोने आयात कमी करण्यासाठी  प्रयत्न केला जात आहे.

Advertisements

सोने आयात घटीने तूटीमध्ये फायदा

वाणिज्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सदर कालावधीमध्ये सोने आयातीत 2.62 अब्ज डॉलरने कमी आली आहे. म्हणजेच या दरम्यान देशात 19,377 कोटी रुपयाच्या बरोबरीचे विदेशी चलन देशा बाहेर गेले नसल्याचे सांगितले आहे. यामुळे चालू खात्यामधील वितीय तुटीचा फायदा झाला आहे.

व्यापारी तूटीतही घट

सरकारी आकडेवारीनुसार सोन आयात घटल्यामुळे व्यापारी तूट कमी झाली आहे. चालू व्यापारी वर्षात कमीत कमी कालावधीत व्यापारी तूट 143.12 अब्ज डॉलर झाली आहे. मागील व्यापारी वर्षात समान कालावधीत देशाला 173 अब्ज डॉलरची व्यापारी तूट झाल्याची माहिती आहे.

सोने आयातीत घट सुरूच

सोने आयात डिसेंबर 2019 मध्ये घसरुन सुरुच आहे. भारतीय सोन्याची सर्वात मोठी आयात  करत असतो. मुख्य रुपाने आभूषण उद्योगात सोने आयात केली जाते. देशात प्रत्येक वर्षाला 800 ते 900 टन सोने आयात करण्यात येते.

जेम्स ऍण्ड ज्वेलरी निर्यात घटली

एप्रिल ते फेब्रुवारीमध्ये रत्न-आभूषणांची निर्यात 8.25 टक्क्यांनी घटून 33.78 अब्ज डॉलरवर राहिली आहे. व्यापारी वर्ष 2018-19 मध्ये देशातील सोने आयात 3 टक्क्यांनी घटून 32.8 अब्ज डॉलरवर स्थिरावली आहे.

Related Stories

शेअर बाजारात तेजीची दिवाळी

Patil_p

फ्लिपकार्ट आयपीओ आणणार?

Patil_p

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होतेय घसरण

Patil_p

स्टोरेज मार्केटमध्ये 4 टक्क्यांची वाढ

Patil_p

ग्राहक सेवेमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआयसह स्टेट बँक अव्वल

Omkar B

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

prashant_c
error: Content is protected !!