तरुण भारत

बनवा कडधान्याचं सँडविच

न्याहरीला पोटभरीचे आणि पौष्टिक पदार्थ असावेत, अशी अपेक्षा असते. परंतु त्यासाठी दररोज काय वेगळं करायचं असा प्रश्नही पडतो. मात्र, यातून मार्ग काढता  येण्यासारखा आहे. उदाहरण द्यायचं तर तुम्ही बऱयाचदा ब्रेडबटर खात असाल. या नेहमीच्या ब्रेडबटरला थोडा पौष्टिकतेचा तडका देता येईल. सकाळी किंवा संध्याकाळी कडधान्यांचं सँडविच बनवता येईल. कसं ते जाणून घेऊ….

साहित्य : आठ ब्रेडस्लाईस, अर्धी वाटी उकडलेली कडधान्यं (मूग, मटकी, चणे), दोन उकडलेले बटाटे, दोन हिरव्या मिरच्या, एक कांदा, थोडा चाट मसाला, मीठ, बटर आणि लेटय़ूसची पानं इत्यादी.

Advertisements

कृतीः  सर्वप्रथम सारण तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बटाटे, कडधान्यं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, चाटमसाला आणि मीठ घालून सर्व घटक एकत्र करा. आता प्रत्येक बेडस्लाईसला एका बाजूने बटर लावून घ्या. चार स्लाईसवर लेटय़ूसची पानं ठेवा. त्यावर स्टफिंग पसरवा मग वर दुसरा ब्रेडस्लाईस ठेवा. आता तव्यावर थोडं बटर घाला. सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्या. आता हे सँडविच सॉससोबत खा.

Related Stories

क्रिमी डाळ

Omkar B

कोकोनेट मोहन पॅक

Amit Kulkarni

रवा भजी

Omkar B

काजू ग्रेव्ही

tarunbharat

झटपट चविष्ट डिश

tarunbharat

छोले टिक्की चाट

Omkar B
error: Content is protected !!