तरुण भारत

कोरोनामुळे लागला ब्रेक !

इरफान खानने ‘अंग्रेजी मीडियम’मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता होती. चित्रपटाने सकारात्मक सुरूवातही केली. मात्र कोरोना व्हायरसमुळे बर्याच ठिकाणची थिएटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक चित्रपटांना गाशा गुंडाळावा लागला.

इरफान खानच्या ‘अंग्रेजी मीडियम’ने पहिल्या दिवशी 4.3 कोटी रुपये कमावले. ‘अंग्रेजी मीडियम’ पहिल्या दिवशी तीन कोटी रुपयांच्या आसपास कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र चित्रपटाने त्यापेक्षा थोडी चांगली कामगिरी केली. ‘अंग्रेजी मीडियम’सारख्या चित्रपटाकडून धडाकेबाज सुरूवातीची अपेक्षा कधीच नव्हती. ‘माउथ पब्लिसिटी’ चित्रपटाला तारणार यात कोणतीही शंका नव्हती. समिक्षकांकडून ‘अंग्रेजी  मीडियम’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपटाचा ट्रेलर फार कमाल करू शकला नाही. ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये काही वेगळं पहायला मिळेल, असं ट्रेलरवरून तरी वाटलं नाही. हा चित्रपट ‘हिंदी मीडियम’ची उंचीही गाठू शकला नाही. दुसरीकडे कोरोना व्हायरसचा फटकाही चित्रपटाला बसला. अनेक शहरांमध्ये थिएटर्स, मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच प्रेक्षकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं ट्रेडगुरूंचं म्हणणं आहे. सरत्या आठवडय़ातल्या शनिवारी चित्रपटाने तीन कोटी रुपये कमावले. थिएटर्स बंद ठेवण्यात आल्यामुळे ‘अंग्रेजी मीडियम’चं बरंच नुकसान झालं. त्यातच हा चित्रपट ‘हिंदी मीडियम’प्रमाणे मनोरंजन करण्यात अपयशी ठरत असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं. थिएटर्स सुरू असती तर ‘अंग्रेजी मीडियम’च्या कमाईत अधिक भर पडली असती. ‘अंग्रेजी मीडियम’ने दोन दिवसात 7.3 कोटी रुपये कमावले. कोरोना व्हायरसमुळे ‘अंग्रेजी मीडियम’च्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तिकडे ‘बागी 3’ने 94.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मधल्या काळात ‘बागी 3’ ने आमीर खानचा ‘तलाश’ आणि कार्तिक आर्यनचा ‘लुकाछुपी’ या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा प्रवासही आता थांबण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाने 62.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तापसी पन्नूच्या ‘थप्पड’नेही 32 कोटी रुपये कमावले आहेत. सरत्या आठवडय़ातल्या शुक्रवारी चित्रपटाने 25 लाख रुपये कमावले. ‘थप्पड’लाही आता गाशा गुंडाळावा लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बर्याच चित्रपटांना नुकसान सहन करावं लागणार आहे.

Related Stories

पायाला दुखापत होऊनही सईने पूर्ण केले शुटिंग

Patil_p

शंभर सेकंदात पृथ्वीचा नाश

Amit Kulkarni

मिस वर्ल्ड स्पर्धेची मजेशी कहाणी मिसबिहेवियर

Patil_p

‘डॉक्टर डॉन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

prashant_c

मोगरा : मराठीतील पहिले-वहिले ऑनलाईन लाईव्ह नाटक

Patil_p

सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!