तरुण भारत

सोया टिक्की

साहित्य : 200 ग्रॅम सोया ग्रॅन्युअल्स, 200 ग्रॅम मिक्स कडधान्येः मसूर, उडीद, मूग, मटकी, चवळी, हरभर इत्यादी. प्रत्येकी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, लवंग, दालचिनीपूड, लिंबूरस, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरलेली मूठभर, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ व तिखट

कृती : प्रथम कडधान्ये भिजवून घ्या. यामध्ये फार पाणी ठेवू नका. ग्रॅन्युअल्स शिजवून पिळून घ्या.कडधान्ये भरडसर वाटून त्यात हे सोया मिश्रण करा. यामध्ये आलं लसूण पेस्ट, लवंग, दालचिनीपूड, लिंबूरस, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरलेली मूठभर,  मीठ व तिखट हे सर्व घालून एकजीव करा. यामध्ये ब्रेडचा चुरा घालून मिश्रण घट्ट करा. याचे गोलाकार चपटय़ा आकार टिक्की बनवा. तेल गरम करून या टिक्की शॅलो फ्राय करून घ्या. टोमॅटो केचअपसोबत खाण्यास द्या.

Advertisements

Related Stories

कबाब ग्रेव्ही

Omkar B

खवा-पनीर गुलाबजाम

Omkar B

क्रिस्पी व्हेजिटेबल्स

Omkar B

टेस्टी समोसा सँडविच

Amit Kulkarni

चविष्ट पनीर समोसे

Omkar B

चटपटीत रिंग

Omkar B
error: Content is protected !!