तरुण भारत

गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये किलोने मिळणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनदरम्यान रेशन दुकानांतर्गत 80 कोटी लाभार्थ्यांना 27 रुपये किलोचा गहू प्रतिकिलो दोन रुपये दराने आणि 32 रुपये किलोचा तांदूळ प्रतिकिलो 3 रुपये दराने देण्यात येणार आहे.

Advertisements

सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत 80 कोटी लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप होणार आहे. त्यासाठी धन्याचा मासिक कोटा दोन किलोने वाढवून सात किलो करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आला आहे.

लॉकडाउन काळात हातावर पोट असणाऱया गरीब जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून रेशन दुकानात प्रतिव्यक्ती सात किलो धन्य अत्यंत स्वस्त दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. 27 रुपये किलो भाव असलेला गहू प्रतिकिलो 2 रुपयाने आणि 32 रुपये किलो भावाचा तांदूळ स्वस्त दर दुकानांतून प्रतिकिलो 3 रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाटप प्रणालीमार्फत वाटप करण्यासाठी सर्व राज्यांना केंद्राकडून धान्य उचलण्यास सांगण्यात आले आहे.

Related Stories

दिलासादायक : बिहारमध्ये एका दिवसात 1700 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

दिल्ली दंगल : बळींची संख्या 47 वर

tarunbharat

बिहारमध्ये वीज तांडव; 83 जणांचा मृत्यू

pradnya p

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

pradnya p

पाकिस्तानकडून आगळीकींचा उच्चांक

Omkar B

उत्तराखंड : टिहरीमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p
error: Content is protected !!