बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन असतानाही बेळगाव एपीएमसीमध्ये शेतकरी बांधव तसेच भाजीविपेत्यांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर आळा घालण्यासाठी जिल्हय़ातील शेतकऱयांवर भाजीपाल्यासह अन्य कृषी उत्पादन एपीएमसीमध्ये आणण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळळी यांनी शुक्रवारी हा आदेश बजावला आहे. शेतकऱयांनी भाजीपाल्यासह अन्य कृषी उत्पादने संबंधीत तालुक्मयातील एपीएमसी किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी, असे जिल्हाधिकाऱयांनी कळविले आहे.
कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन होत आहे. बेळगाव एपीएमसीच्या प्रांगणात जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाला येत असतो. यामुळे याठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने शेतकऱयांनी या ठिकाणी न येता संबंधीत तालुक्मयातील बाजारपेठेत आपली कृषी उत्पादनांची विक्री करावी, असे कळविण्यात आले.
याबरोबरच येथील एपीएमसी प्रांगणातील विपेत्यांनाही ठरावीक जागेत बसून विक्री करण्याची सूचना करण्यात आली आहे. यासाठी विपेत्यांना ठरावीक जागा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनी दिला आहे. याबरोबरच सर्वसामान्यांनाही थेट एपीएमसीमध्ये येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
हापकॉम्स आणि पत्रकार संघाच्या वतीने भाजी विपेत्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपापल्या भागात येणाऱया विपेत्यांकडूनच भाजीची खरेदी करावी, असेही कळविण्यात आले आहे..