तरुण भारत

संचारबंदी : वैरागमध्ये भाजी- मंडईत मोठी गर्दी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/ वैराग

जगासह देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातले आहे. सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तरीही वैराग मधील नागरिक घराबाहेर पडून मोठी गर्दी करीत असल्याचे पाहिला मिळाले. पोलिसांनी वेळोवेळी सूचना करून देखील नागरिकांकडून याचे पालन होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

वैराग शहरातील लोक चौका- चौकात गर्दी करीत असल्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून प्रसाद दिला जात आहे. मात्र तरीही नागरिक चौका- चौकात गर्दी करीत आहेत. तर भाजीपाला खरेदीसाठी भाजी- मंडईत मोठी गर्दी करीत आहेत. नागरिक वैराग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आरुण सुगावकर,यांनी गावोगावी फिरून गर्दी हटवत आहेत. मात्र पोलिस गेल्यानंतर लोक पुन्हा चौकात, मंदिरात गर्दी करीत आहेत. त्यामुळे गावातील चौकातील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र वैराग ग्रामीण भागात दिसत आहे.

Advertisements

गावात गर्दी वाढली

कोरोना व्हयरसमुळे शहरी भागातील नागरिक गावाकडे मोठ्या प्रमाणात आले आहेत. गावात आल्यानंतर घरात बसण्याऐवजी चौका चौकात गर्दी करीत आहेत. तर काही लोक घरातच बसणे पसंत करीत आहेत. गावातील आणि बाहेरून आलेले लोक एकत्रित येत आहेत. त्यामुळे गावात गर्दी वाढत आहे. ]

Related Stories

पंढरपूरजवळ दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार, एक जखमी

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांना मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते; फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सवाल 

Abhijeet Shinde

कोविडमुळे आई-वडील हिरावलेल्या मुलांना निर्वाह भत्ता सुरू करत मोफत शिक्षण द्या

Abhijeet Shinde

सोलापूर : खेडभोसे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

Abhijeet Shinde

सोलापूर : प्लाझ्मा थेरपीसाठी बार्शीतील शाह रक्तपेढीला मान्यता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!