तरुण भारत

इटलीचे शहर ‘वो’ जगासाठी आशेचा किरण

कोरोना संसर्गापासून पूर्णपणे मुक्त : जगाने धडा घेण्याची गरज : ठोस पावले उचलून संकट संपविले, चाचणीवर भर

कोरोना विषाणूच्या संकटामुळे इटली घायकुतीला आला आहे. जगभरातील पर्यटकांची पसंत राहिलेल्या इटलीची स्थिती आता दयनीय झाली आहे. कोरोनामुळे तेथे आतापर्यंत 9134 जणांना जीव गमवावा लागला असून 86468 जणांना याची लागण झाली आहे. या भयावह संकटादरम्यान इटलीचे एक शहर जगासाठी आशेचा किरण दाखवत आहे. ‘वो’ असे या शहराचे नाव आहे.

Advertisements

इटलीच्या वेनेतो या भागातील वो शहराची लोकसंख्या सुमारे 3 हजार आहे. हे शहर व्हेनिसपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. 21 फेब्रुवारी रोजी या शहरातील एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने या शहराला क्लस्टर इंफेक्शन ठरविले होते. या शहराने 23 फेब्रुवारी रोजी स्वतःला विलग केले होते.

या निर्णयानंतर शहराच्या सीमेवर लोखंडी भिंत उभारण्यात आली. या भिंतीच्या माध्यमातून ये-जा करण्याची अनुमती नाकारण्यात आली. केवळ औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱयांनाच प्रवासाची अनुमती देण्यात आली. आपत्कालीन स्थितीत लोकांना क्वारेंटाईन करणे आणि अधिकाधिक चाचणी करणे, हेच मुख्य धोरण राहिल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी अलेस्सियो टूरेट्टा यांनी दिली आहे.

दक्षिण कोरियाची रणनीति

दक्षिण कोरियाने हेच प्रारुप अत्यंत यशस्वीपणे राबविले आहे. वो शहरातील 97 टक्के जनतेची चाचणी करण्यात आली. इटलीत अन्यत्र मात्र असे कुठलेच घडले नाही. वो शहरात एका दिवसात 800 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 29 फेब्रुवारी रोजी सामूहिक तपासणीनंतर 3 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या सर्वांना घरातच कैद करण्यात आले आहे. याचबरोबर गंभीर आजारी असलेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

विषाणूचा फैलाव रोखला

घरात कैद असलेल्या लोकांना वारंवार फोन करण्यात आला आणि ते विलगीकरणाची प्रक्रिया योग्यप्रकारे राबवत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात आली. चाचणी अहवाल मिळाल्यावरही सर्व लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आले. फारच कमी वेळा घरातून बाहेर पडू देण्यात आले. शहराने राबविलेले हे धोरण अत्यंत यशस्वी ठरले आहे. 6 आणि 8 मार्च रोजी पुन्हा चाचणी झाली असता केवळ 1 टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. 23 मार्च रोजी झालेल्या चाचणीनुसार विषाणूचा प्रसार थांबला असून आता तेथे एकही रुग्ण नाही.

Related Stories

उत्तरप्रदेश : 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

datta jadhav

‘सारथी’बाबत अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा

Abhijeet Shinde

भारतीयांची ‘सेल्फ इम्युनिटी’ ठरतेय वरचढ

Patil_p

अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 9 मुले जखमी

datta jadhav

युपी : योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? सिंह यांचे निकटवर्तीय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!