तरुण भारत

कार्डधारकांना दोन महिन्यांचे रेशन एकाचवेळी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोविड-19 मुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने जिल्हय़ातील अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षितता कायद्यान्वये पुढील महिन्यात एप्रिल आणि मे महिन्यातील रेशन एकाचवेळी देण्यात येणार आहे. राज्य सरकारवतीने याआधीच ही घोषणा करण्यात आली होती. एप्रिलमध्ये कार्डधारकांना हा रेशन पुरवठा करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत सर्व रेशन दुकानांतून रेशन पुरवठा करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Advertisements

एप्रिलमध्ये आहार पुरवठय़ात काहीसा बदल करण्यात आला आहे. याआधी बीपीएल कार्डधारकांना प्रत्येक सदस्यामागे 7 किलो तांदूळ देण्यात येत होता. मात्र, आता प्रत्येक सदस्यामागे 5 किलो प्रमाणे दोन महिन्यांचा 10 किलो तांदूळ आणि प्रत्येक कार्डधारक कुटुंबाला दोन किलो गहू याप्रमाणे दोन महिन्यांचा 4 किलो गहू मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारकांना 70 किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार

सध्या लॉकडाऊनमुळे कोणत्याही दुकानासमोर गर्दी होऊ नये, यादृष्टीने ठराविक चौकटी घालण्यात आल्या आहेत. रेशन दुकानांसमोरही गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. एकाच दिवशी कार्डधारकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक दिवशी ठराविक संख्येत कार्डधारकांना बोलाविण्यात येणार आहे. आणि सुरक्षित अंतर ठेवूनच त्यांना रेशन पुरवठा करण्यासाठी दुकानदारांना सूचना

Related Stories

‘मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे’ टी-शर्ट खटला लांबणीवर

Amit Kulkarni

विनामास्क कारवाईकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

प्लाझ्मा दान करणाऱ्यांना मिळणार ५ हजार: मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

परिवहन मंडळाच्या संपाचा तिढा कधी सुटणार?

Patil_p

कंग्राळी खुर्द येथील महिला 15 दिवसांपासून बेपत्ता

Rohan_P

वाहून जाणाऱयाचा जीव वाचविणाऱया कार्लेकरचा किरण जाधवनी केला सन्मान

Amit Kulkarni
error: Content is protected !!