तरुण भारत

बेळगाव जिल्हय़ानेही आता अधिक दक्षता घेणे गरजेचे

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी-आरोग्याधिकाऱयांची सूचना

बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हय़ातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱयांना जिल्हाधिकारी आणि आरोग्याधिकाऱयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाबाबत अधिक दक्षता घेण्याची सूचना केली आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा याबाबत जनतेला मार्गदर्शन करून दक्षता घेण्याची सूचना करावी, असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रामधील सांगली जिल्हय़ामध्ये एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ानेही आता अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्हय़ाला लागून हा जिल्हा आहे. त्यामुळे आता अधिक धास्ती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातून येणाऱयांवर निर्बंध घातले गेले आहेत. असे असले तरी महाराष्ट्राला अनेक मार्ग जोडले गेल्यामुळे पोलीस व इतर अधिकाऱयांनी दक्ष रहावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

कोरोना तिसऱया टप्प्यात आला असून आता देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. असे असले तरी बेळगाव जिल्हय़ातील जनता अजूनही म्हणावे तसे गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा प्रत्येकाला घरातच थांबण्याबाबत सूचना करणे गरजेचे आहे. कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, घरात जे आहे ते खाऊन घरातच थांबावे, असे आवाहन प्रत्येक तालुक्मयातील अधिकाऱयांनी करावे, असे सांगण्यात आले आहे.

डॉक्टर-कर्मचाऱयांनी कामचुकारपणा केल्यास

कठोर कारवाई करणार

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार केल्यानंतर जर एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवून द्यावे, असे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांनी थांबून त्या ठिकाणी जनतेची सेवा करावी, अशी सक्त ताकीद दिली आहे. जर कोणत्याही डॉक्टर व कर्मचाऱयाने कामचुकारपणा केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी, आरोग्याधिकारी यांसह जिल्हा पंचायत सीईओ व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

नुकसानभरपाई नाही; घरबांधकामाबाबत मिळाली नोटीस

Patil_p

पोस्ट कर्मचाऱयांचा संप यशस्वी

Patil_p

औषध दुकानदारांना पोलिसांचा त्रास

Patil_p

टोल चुकविण्यासाठी कोगनोळीतून वाहतूक

Patil_p

राजहंसगड येथील विजयी उमेदवार

Patil_p

दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

Patil_p
error: Content is protected !!