तरुण भारत

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

पुणे / प्रतिनिधी :

जगभरात कोरोना आजाराचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहे. तेथील आणि आपल्या देशातील रुग्णांची संख्या लक्षात घेतली, तर ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर येईल, असा दावा डॉ. रोहिदास बोरसे यांनी येथे केला. मात्र, यासाठी नागरिकांनी घरीच बसून सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसोबत आणि उपचार करणाऱया काही डॉक्टरांसोबत चर्चा केली. यात पुण्यातील डॉ. रोहिदास बोरसे यांचाही समावेश होता.

डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी फोन करून माहिती जाणून घेतली. या संवादामधून अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. माझ्यासह अनेक डॉक्टर रुग्णांना सेवा देण्याचे काम करत आहेत. येणारा रुग्ण सुरुवातीला भयग्रस्त असतो, पण आम्ही सतत संवाद साधतो. त्या व्यक्तीला त्यामधून बाहेर काढतो. आजपर्यंत पुण्यातून 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. तर दुसऱया बाजूला सरकारने तातडीने लॉकडाउन जाहीर केला आहे. पण याच लॉकडाउनमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढू शकते. याआधीच कानाला, नाकाला, डोळय़ाला आणि तोंडाला सतत हात लावल्याने या व्हायरसने काहींच्या शरीरात प्रवेश केल्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आजपासून पुढील 15 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चीन, इटली, स्पेन आणि अमेरिका या देशांसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार नाही. याची काळजी आपले सरकार घेत आहे. येणाऱया काळात ससून रुग्णालयाच्या आवारातील इमारतीमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. येणाऱया परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

सोलापूर : अक्कलकोटमध्ये आढळले सहा कोरोना बाधित रुग्ण

Abhijeet Shinde

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती; 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

datta jadhav

इस्लामपुरात तो शाही हार मोलकरणीनेच चोरला

Sumit Tambekar

पुण्यात झोपडपट्टीतील नागरिकांना घराजवळच मिळणार कोरोना लस

Abhijeet Shinde

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

Rohan_P

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!