तरुण भारत

रोबोद्वारे अन्न व औषधवाटप; जयपूरमध्ये प्रयोग सुरू

 ऑनलाईन टीम / जयपूर :

कोरोनाविरोधी लढा लढण्यासाठी जयपूरमधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अन्न व औषधे देण्यासाठी रोबोटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱयांना कोरोनो विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. एसएमएस हॉस्पटिलचे अधीक्षक डॉ. डी. एस. मीना यांनी याबाबतची माहिती दिली.

Advertisements

डॉ. डी. एस. मीना म्हणाले, कोरोना विषाणूचा रुग्णालयातील कर्मचाऱयांना संसर्ग होऊ नये, यासाठी एका खासगी कंपनीने हा रोबो दिलेला आहे. हा ह्यूमनॉईड रोबो रुग्णालयातील ठरावीक रुग्णांना औषधे आणि अन्नाचा टे नेऊन देत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना कोरोनाग्रस्तांच्या जवळ जाण्याची गरज भासत नाही. तसेच कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो. सध्या रुग्णालयात या ह्यूमनॉईड रोबोचे प्रयोग सुरू आहेत. तो किती कार्यक्षमपणे काम करतो, हे तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे.

या रोबोची निर्मिती क्लब फर्स्ट या कंपनीने केली आहे. या रोबोमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि इंटरनेट इंटरनेट ऑफ थिंग्स् या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा रोबो स्वतः दिशा ठरवून मार्गक्रमण करतो.

Related Stories

कोरोना लढण्यासाठी गुगलचे खास डूडल

prashant_c

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

pradnya p

माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून ‘माळशेज पतंग महोत्सव’

prashant_c

भारतीय वायुदलाचा 88 वा स्थापना दिवस : अभिमानास्पद गगनभरारी

pradnya p

दिव्यांग व अनाथ मुलांसाठी बाल आनंद मेळावा रविवारी

prashant_c

अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांचं प्रदर्शन 21 जानेवारी पासून

prashant_c
error: Content is protected !!