तरुण भारत

कोरोना लढाईत गुगल चा पुढाकार, पिचाईंकडून 5,900 कोटी

ऑनलाइन टीम नवी दिल्ली 

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. त्यामुळे अनेक देशामध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. भारतात देखील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात 24 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर कोरोना ग्रस्तांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे. कोरोना ग्रस्ताना मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील मदत देऊ केली आहे. सुंदर पिचाई यांनी 5 हजार 900 कोटींची मदत जाहीर केली आहे. सुंदर पिचाई यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, लघु – मध्यम उद्योग, आरोग्य संघटना, प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही मदत दिली जात आहे. यामध्ये गुगल अँड क्रेडिट रूपात 340 मिलियन डॉलर दिले जातील. तसेच आरोग्य संघटना शंभरपेक्षा अधिक शासकीय यंत्रणेसाठी 1800 कोटी रुपयांची मदत असणार आहे. तर स्वयंसेवी संस्था, लघु व मध्यम उद्योगासाठी 2500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.  

Advertisements

Related Stories

देशात 11.21 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

बसपाचे 6, भाजपचा एक आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav

बिहार सरकारने ‘या’ तारखेपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

हरियाणा : शालेय शिक्षणात होणार आता योगाचा समावेश

Rohan_P

भंवरी हत्याकांडातील आरोपी, माजी मंत्री महिपाल मदेरना यांचे निधन

datta jadhav

उत्तराखंडात 448 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!