तरुण भारत

कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी गंभीरची आणखी एक कोटीची मदत

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेसह, सुरेश रैनाचाही पुढाकार, मोहन बगान फुटबॉल क्लबचीही 20 लाखांची मदत, देशभरातील खेळाडू व क्रीडा संघटनाही पुढे सरसावले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी समाजातील अनेक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला असून अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लांबणीवर टाकल्या आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, खासदार गौतम गंभीर, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, इरफान व युसुफ पठाण, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह देशभरातील अनेक क्रीडा संघटना कोरोनाविरुद्ध लढय़ात पंतप्रधान आणि स्थानिक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करत आहेत. कोरोनाविरुद्ध लढा बळकट करण्यासाठी देशभरातील अनेक खेळाडूंनी वैद्यकीय यंत्रणा, हॉस्पीटल तसेच अन्नधान्याचे वाटप करत सामाजिक भान राखले आहे.

 माजी क्रिकेटपटू व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने खासदार निधीतला 1 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर अकाऊंटवरुन त्याने याबाबतची माहिती दिली. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत राजकारणात आलेल्या गंभीरने मागील आठवडय़ात कोरोना व्हायरस संक्रमणाविरूद्ध दिल्ली सरकारला मदत करण्यासाठी खासदार निधीतून 50 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. यानंतर, शनिवारी पीडित वंचितांना त्यांची टीम बाहेर येऊन अन्नाचे वाटप करताना दिसली आहे. आता, आणखी पुढे जात त्याने आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान निधीला दिला आहे. गंभीरच्या या सामाजिक जबाबदारीचे क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी कौतुक केले आहे.

Related Stories

न्यूझीलंड अ संघाच्या डावात फिलीप्सचे अर्धशतक

Patil_p

पहिल्या कसोटीसाठी पाक संघ जाहीर

Patil_p

आज फातोडर्य़ात होणार एफसी गोवा आणि मुंबई सिटीत स्फोटक लढत

Patil_p

मुश्ताक अली क्रिकेट आयोजनाची मुंबईला परवानगी द्यावी : एमसीए

Patil_p

महान फुटबॉलपटू दिएगो माराडोना कालवश

Omkar B

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी विकल्या 102 ट्रॉफी

Patil_p
error: Content is protected !!