तरुण भारत

पाकिस्तानात बजबजपुरी

डॉक्टरने डोक्याला गुंडाळली प्लास्टिकची पिशवी

कोरोना विषाणूच्या महासंकटाला तोंड देणाऱया पाकिस्तानच्या एका डॉक्टरने इम्रान खान सरकारच्या दाव्यांची हवाच काढून घेतली आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील डॉक्टरने रुग्णांच्या तपासणीसाठी मास्क आणि ग्लोव्ह्ज नसल्याने एक अनोखा मार्ग स्वीकारला आहे. डॉक्टरने चेहऱयावर मास्कच्या ऐवजी प्लास्टिक पिशवी परिधान करत छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे.

Advertisements

डॉक्टरच्या या कृतीनंतर सरकारने संबंधित अधिकाऱयांच्या विरोधात चौकशीस प्रारंभ केला आहे. तर डॉक्टरवर अधिकाऱयांचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. स्वाबी येथील जिल्हा आरोग्य विभागाने शनिवारी डॉक्टर आमिर मुस्तफा यांच्या विरोधातील चौकशीस प्रारंभ केला आहे.

डॉक्टर मुस्तफा यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांतात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. इम्रान खान यांच्या दाव्यानंतरही डॉक्टरांना सुरक्षा उपकरणे मिळू शकलेली नाहीत. अशा स्थितीमुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Related Stories

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भीषण वणवा

Patil_p

वाघ-सिंहांसोबत खेळणारा श्रीमंत शेख

Amit Kulkarni

8 सेकंदांसाठी विलगीकरणाचा भंग, मोठा दंड

Omkar B

युरोप : 3 लाख बळी

Omkar B

फायझर-बायोएनटेक कंपन्यांवर सायबर हल्ला

datta jadhav

मेलबर्नमध्ये 26 ऑक्टोबपर्यंत लॉकडाऊन

datta jadhav
error: Content is protected !!