तरुण भारत

बदामी पनीर

साहित्य : 1 वाटी पनीरचे चौकोनी तुकडे, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, चिमुटभर हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा जिरेपावडर, अर्धा चमचा धणेपूड, 2 चमचे क्रिम, चिमुटभर साखर, 4 चमचे तेल, चवीपुरते मीठ, सजावटीसाटी कोथिंबीर, पेस्टसाठीः 20 बदाम, 2 काश्मीरी मिरच्या, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धा इंच आलं किसून, 4 लसूण पाकळय़ा चिरुन, अर्धी वाटी पाणी

कृती : पेस्टसाठी दिलेले साहित्य मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. ओव्हन बाऊलमध्ये पनीर घेऊन त्यात हळदपूड, लाल तिखट पावडर, चमचाभर तेल आणि मीठ मिक्स करून मिनिटभर ओव्हनमध्ये ठेवून बाहेर काढावे. नंतर त्यात बदाम पेस्ट आणि तेल घालून बाऊल पाच मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवावे. आता त्यात टोमॅटो प्युरी आणि इतर साहित्य घालून मिश्रण मिक्स करून बाऊल पुन्हा तीन मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवावे. आता तयार बदाम पनीर मिक्स करून कोथिंबीरीने सजवून नानसोबत द्या.

Advertisements

Related Stories

टेस्टी समोसा सँडविच

Amit Kulkarni

रागी कांजी

Omkar B

पास्ता चिप्स

tarunbharat

दूध भेसळीपासून सावधान

tarunbharat

सोया पुरी

Omkar B

रवा भजी

Omkar B
error: Content is protected !!