तरुण भारत

देशातील विदेशी मुद्रा भंडारात 2008 नंतर सर्वाधिक घसरण

मुंबई : कोरोना विषाणूच्या विळख्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून देशातील विदेशी भांडवल भंडारामध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. ही घसरण मागील 12 वर्षांचा विक्रम मोडला आहे. विदेशी मुद्रा भांडार 469.909 अब्ज डॉलरवर राहिले आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे भारतासोबत जगाची अर्थव्यवस्था मंदीच्या छायेखाली आली आहे. यामुळे भारतीय विदेशी मुद्रा भांडारही प्रभावीत झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार 20 मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात देशातील विदेशी मुद्रा भंडारात 11.98 अब्ज डॉलर इतकी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. या अगोदर 20 सप्टेंबर 2019 रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात विदेशी मुद्रा भंडार 38.8 कोटी डॉलरने घसरुन 428.58 अब्ज डॉलरवर स्थिरावले होते.  6 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात देशाचा विदेशी मुद्रा भांडार 5.69 अब्ज डॉलरने वाढून 487.23 त्याने अब्ज डॉलरचा उच्च स्तर पार केला होता. कोरोनाचा वाढता विळखा विदेशी गुंतवणूकादरांचा विश्वास कमी होण्यासोबतच आपली रक्कम काढून घेण्याकडे अनेकांचा कल राहिला आहे. याचाच परणाम म्हणून 23 मार्च रोजी रुपया 76.15 प्रति डॉलरने खालचा स्तर गाठला होता.

Related Stories

अप्लायन्सेसच्या विक्रीवर वाढता दबाव

Patil_p

किया मोटर्स राष्ट्रीय प्रमुखपदी हरदीप सिंग ब्रार

Patil_p

कंपनी कायद्यात संशोधन होणार

Patil_p

दुसऱया दिवशीही शेअर बाजार घसरणीत

Patil_p

वाढत्या जागतिक किमतीमुळे साखर निर्यातीची शक्यता वाढली

Patil_p

वाहन उद्योगाला दररोज 2300 कोटींचा फटका

Omkar B
error: Content is protected !!