तरुण भारत

अर्थव्यवस्थेत चालू वर्षात 0.5 टक्क्मयांची घसरण शक्मय

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम एप्रिल ते जून तिमाहीवर होणार, हे निश्चित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

देशातील वाढते कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि त्याचा होणारा भारतामधील उद्योगधंद्यावरील नकारात्मक प्रभाव यामुळे आगामी काळात भारतासोबत जगातील अर्थक्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीती तज्ञांकडून क्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक नकारात्मक कामगिरीचा आलेख एप्रिल ते जून या तिमाहीवर हेणार आहे. त्याच प्रमाणात देशातील जीडीपीचा वार्षिकप्रमाणात मांडण्यात येणारे अनुमान जवळपास 10.3 टक्क्मयांनी घटण्याची शक्मयता आहे. 

भारतासारखीच स्थिती अमेरिकेत होणार असून अमेरिकेतील मंदी पुढील काही दिवस कायम राहण्यासोबत जीडीपीचा दर चालू वर्षात 11 टक्क्मयांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावीत होण्याची शक्मयता आहे. जपानची गुंतवणूक बँक व फायनाशिअल सर्व्हिसेस कंपनी नोमुरा यांच्या सर्वसाधारण माहितीनुसार 2020 मध्ये भारतामधील विकासदराचे अनुमान 4.5 टक्क्य़ांनी घटून वजा 0.5 टक्के राहण्याची माहिती दिली आहे.

मार्चमधील विकासदर

सर्वसाधारण परिस्थितीत मार्च तिमाहीमधील आर्थिक विकासदर 3.1 टक्के राहण्याचे अनुमान नोमुराचे संचालक आणि भारताचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सोनल वर्मा जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव या अहवालानुसार देशातील आर्थिक विकासदर 2019च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टो..डिसें 2019) 4.7 टक्क्मयांनी घटून चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत (जानेवारी..मार्च) या काळात 3.1 टक्के राहण्याचे अनुमान आहे.

बेरोजगारी व सामाजिक असंतोष

सध्या जगावर कोसळलेल्या कोरोना संकटाचा परिणाम रोजगार व सामाजिक असंतोष निर्माण होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्मयता आहे. भारतात येत्या काळात कर्जांचे संकट, कंपन्यांचे अस्तित्व टिकविण्याचे संकट यासोबत बँकांच्या ताळेबंदचा मेळ घालणे कठीण होणार आहे. यामुळे नवीन रोजगार निर्मितीचे संकट ओढवणार अशी शक्यता आहे.  

Related Stories

सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

Patil_p

शेअर बाजारात आठवडय़ाचा प्रारंभ तेजीसोबत

Patil_p

नोव्हेंबरमध्येही देशातील विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Omkar B

चहा उद्योगातील कर्मचाऱयांसाठी लवकरच कल्याणकारी योजना?

Amit Kulkarni

श्याम मेटालिक्सचा आयपीओ 14 जूनला

Patil_p

चालू आर्थिक वर्षात मुख्य सात क्षेत्रांवर कोरोनाची छाया

Patil_p
error: Content is protected !!